शक्तीपीठे
- dileepbw
- Sep 11, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.गिरीष वाणी यांनी संकलित केलेली भारतातील दुर्गामातेच्या शक्तीपीठांची माहिती सर्वांच्या संग्रहासाठी प्रसृत करीत आहे.
शक्तीपीठांच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातील फक्त नाशिक जिल्हयातील गोदावरी नदीच्या काठावरील "भ्रामरीदेवी" या शक्तीपीठाचा समावेश आहे.
माता दुर्गेची ५१ शक्तीपीठे खालील प्रमाणे :-
१)भ्रामरीदेवी, गोदावरी नदी,नाशिक (महाराष्ट्र) भारत
२)महामाया, अमरनाथ पहलगाव(काश्मिर) भारत
३)सिधिदा (अंबिका) / ज्वालाजी, कांगड़ा(हिमाचल प्रदेश) भारत
४)त्रिपुरमालिनी, छावनी स्टेशन जवळ जालंधर(पंजाब) भारत
५)जयदुर्गा, बैधनाथधाम देवघर(झारखंड) भारत
६)विमला, बिराज उत्कल (ओरीसा)
७)देवी बाहुला, अजेय नदिच्या तीरावर, केतुग्राम कटुऑ, जि.वर्धमान(पश्चिमबंगाल) भारत
८)मंगलचंद्रिका, उजैन, जि.वर्धमान,पश्चिमबंगाल)भारत
९)त्रिपुरसुंदरी, माताबढी पर्वतशिखर, राधाकिशोरपुर गावाजवळ, उदरपुर(त्रिपुरा) भारत
१०)भ्रामरी, सालबाढ़ी, ता.बोडा, जि.जलपाइगुड़ी(पश्चिम बंगाल)
११)कामाख्या, नीलांचल पर्वत, गुवाहाटी(असाम)भारत
१२)जुगाड्या, जुगाड़्या,खीरग्राम, जि.वर्धमान(पश्चिम बंगाल) भारत
१३)कालिका, हुगळी नदीच्या तीरावर कालिघाट, कलकत्ता(पश्चिम बंगाल) भारत
१४)ललितादेवी, प्रयाग संगम, इलाहाबाद(उत्तर प्रदेश) भारत
१५)विमला, किरीटकोण, लालबाग कोर्ट रोड स्टेशन, जि.मुर्शीदाबाद(पश्चिम बंगाल)भारत
१६)विशालाक्षी तथा मणिकर्णी, मणिकर्णिका घाट,काशी, वाराणसी(उत्तर प्रदेश) भारत
१७)श्रवणी/कन्याकुमारी कन्याश्रम,भद्रकाली मंदिर, कुमारी मंदिर(तामिळनाडु) भारत
१८)सावित्री, कुरुक्षेत्र(हरियाणा) भारत
१९)गायत्री, मणिबंध,गायत्री पर्वत, पुष्करजवळ, अजमेर(राजस्थान) भारत
२०)देवगर्भ, कांची,कोपई नदीतीरावर, उत्तर-पूर्व बोलापुर स्टेशन, जि.वीरभुम(पश्चिम बंगाल) भारत
२१)कालीदेवी, कमलाधव, शोणनदी च्या तीरावर गृहेत, एका गृहेत, अमरकंटक(मध्य प्रदेश) भारत
२२)नर्मदा, नर्मदा नदीच्या उगमावर अमरकंटक(मध्य प्रदेश) भारत
२३)शिवानी, रामगिरी, झांसी-माणिकपुर रेल्वे मार्गावर, चित्रकूट(उत्तर प्रदेश) भारत
२४)उमा, भूतेश्वर महादेव मंदिराजवळ वृंदावन मथुरा(उत्तर प्रदेश) भारत
२५)नारायणी, शुचितीर्थम शिवमंदिर, कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम मार्गावर, शुची(तमिळनाडु) भारत
२६)वाराही, पंचसागर (उत्तरांचल) भारत
२७)श्री सुंदरी, श्रीपर्वत, लद्दाख(कश्मीर) याशिवाय श्रीशैलम, जि.कुर्नूल(आंध्रप्रदेश) ह्यालाही मान्याता आहे.
२८)कपालिनी (भीमरूप), विभाष,तामलुक, जि.पूर्व मेदिनीपुर(पश्चिम बंगाल) भारत
२९)चंद्रभागा, प्रभास,वेरावल स्टेशन,सोमनाथ मंदिराजवळ, जि.जूनागढ़(गुजरात) भारत
३०)अवंती, भैरवपर्वत,क्षिप्रा नदीच्या तीरावर, उज्जयिनी(मध्यप्रदेश) भारत
३१)राकिनी/विश्वेश्वरी, सर्वशैल/गोदावरीतीर, कोटिलिंगेश्वर मंदिर, राजमहेंद्री(आंध्रप्रदेश) भारत
३२)कुमारी, रत्नावली,रत्नाकर नदीतीरावर, खानाकुल-कृष्णानगर, जि.हुगली(पश्चिम बंगाल) भारत
३३)अंबिका, बिरात,भरतपुरजवळ (राजस्थान) भारत
३४)कलिका देवी, नलहाटी, नलहाटी स्टेशनजवळ, जि.वीरभूम(पश्चिम बंगाल) भारत
३५)जयदुर्गा, कर्णाट(कांगडा) (हिमांचल प्रदेश) भारत
३६)महिषासुरमर्दिनी, वक्रेश्वर, पापहर नदीतीरावर, दुबराजपुर स्टेशन, बीरभूम(पश्चिम बंगाल) भारत
३७)फुल्लरा, अट्टहास,लाभपुर स्टेशन जवळ, जि.वीरभूम(पश्चिम बंगाल) भारत
३८)नंदिनी, नंदीपुर,चारदीवारी मध्ये वटवृक्ष,सैंथिया रेलवे स्टेशन, जि.वीरभूम(पश्चिम बंगाल) भारत
३९)महाशिरा, गुजयेश्वरी मंदिर, पशुपतीनाथ मंदिराजवळ (नेपाळ)
४०)गंडकी चंडी, मुक्तीनाथमंदिर गंडकी नदीच्या तीरावर पोखरा (नेपाळ)
४१)उमा, मिथिला,जनकपुर रेलवे स्टेशनजवळ, भारत-नेपाल सिमेवर (नेपाळ)
४२)दाक्षायनी, कैलाशपर्वत मानसरोवर (तिबेट)
४३)यशोरेश्वरी, यशोर, ईश्वरीपुर, जि.खुलना(बांग्लादेश)
४४)अर्पण, करतोयतत,भवानीपुर, शेरपुर पासुन २८ कि.मी दुर, बागुरा स्टेशन,(बांग्लादेश)
४५)महालक्ष्मी, श्रीशैल,जैनपुर, उत्तर-पूर्व सिल्हैट टाउन,(बांग्लादेश)
४६)जयंती, कालाजोर भोरभोग, खासीपर्वत, जयंतिया परगना, जि.सिल्हैट,(बांग्लादेश)
४७)भवानी, चंद्रनाथ पर्वत शिखर,सीताकुण्ड स्टेशनजवळ, जि.चिट्टागौंग (बांग्लादेश)
४८)सुनंदादेवी, बरिसल पासुन २० कि.मी दुर शिकारपुर(बांग्लादेश)
४९)हिंङगोलादेवी/कोट्टरी हिंङगलज,कराचीपासुन १२५ कि.मी दुर (पाकिस्तान)
५०)नैनादेवी/महिषासुरमर्दिनी, सुक्कर स्टेशन जवळ (पाकिस्तान), याशिवाय नैनादेवीमंदिर बिलासपुर(हिमांचलप्रदेश) हे सुद्धा मानले जाते.
५१)इंद्रक्षी / नागपुषणीदेवी, जाफना (श्रीलंका)
एका मतानुसार ट्रिंकोमाली मध्ये माता मंदिर असून पोर्तुगाली बाॅम्ब वर्षावात ते उध्वस्त झाले.पण एक स्तंभ शिल्लक असून प्रसिद्ध त्रिकोणेश्वर मंदिराजवळ आहे.
या शक्तीपीठांशिवाय काही ठिकाणी जागृत देवींची मंदिरे आहेत.ती अशी :-
१)कामाक्षीदेवी, कांचीपुरम् मेखला, कांची(तामिळनाडु) भारत
२)अम्बाजी, अरसुरी(गुजरात) भारत
३)ज्वालामुखी/ज्वाला, पठाणकोट(गुजरात)भारत
४)दन्तेश्वरी, दन्तेवाडा(छत्तीसगड) भारत
५)विंध्यवासिनी मंदिर, मिर्ज़ापुर, (उत्तरप्रदेश)भारत
६)महामाया मंदिर, अंबिकापुर, अंबिकापुर, (छत्तीसगढ़)भारत
७)योगमाया मंदिर, दिल्ली, महरौली, (दिल्ली)भारत
८)वैष्णोदेवी, (जम्मु-काश्मिर)भारत
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा गौरवशाली इतिहास या शक्तीपीठांभोवतीच फिरत असल्याने व या समाजाचा भूतकाळ,वर्तमानकाळ व भविष्यकाळ या शक्तीपीठांशी निगडीत असल्याने सर्व समाज बांधवांनी त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करावा.ही नम्र विनंती.
या अभ्यासगटात या विषयी पुरेशी माहिती दिलेली आहे.ती सर्वांनी,विशेषत: शिक्षकवर्गाने अवश्य वाचावी व त्यामध्ये भर घालावी.ही विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०१०)




Comments