top of page

"राग चांद्रकौस - जाने बहार हुस्न तेरा"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 3 min read

"राग चांद्रकौस - जाने बहार हुस्न तेरा"

©दिलीप वाणी,पुणे

"प्यार किया तो डरना क्या" या १९६३ सालच्या

फिल्ममधले मोहम्मद रफी यांनी गायलेले,शकिल बदायुनी यांचे,संगीतकार रवी यांनी "चांद्रकौस" या रागात स्वरबध्द केलेले "जाने बहार हुस्न तेरा" हे पडद्यावर शम्मी कपूर व सरोजा देवी यांनी सादर केलेले गीत जरूर ऐका.

जान-ए-बहार हुस्न तेरा बेमिसाल है

वल्लाह कमाल है अरे वल्लाह कमाल है

आयी है मेरे पास तू इस आन-बान से

उतरी हो जैसे कोई परी आसमान से

मैं क्या कहूँ ख़ुशी से अजब मेरा हाल है

हाए ये तेरी मस्त अदाएं ये बाँकपन

किरनों को भी मैं छूने ना दूंगा तेरा बदन

तुझसे नज़र मिलाए ये किसकी मजाल है

मैं ख़ुशनसीब हूँ कि तुझे मैंने पा लिया

तूने करम किया मुझे अपना बना लिया

ऐसे मिले हैं हम के बिछड़ना मुहाल है

आता या "राग चांद्रकौस" ची तांत्रिक माहिती ऐका.

राग :चांद्रकौस

थाट :काफी

जाती :ओडव ओडव( पाच स्वर )

वृषभ व पंचम स्वर वर्ज

वादी स्वर मध्यम

संवादी स्वर षडज

गायन समय रात्रीचा तिसरा प्रहर

गांधार व धैवत कोमल

आरोह :सा ग* म ध * नि सा '

अवरोह :सा' नि ध* म ग* सा .नि सा

पकड : म ध*नि सा ' नि ध* म ग म ग सा, .ध* .नि सा' नि ध* म ग* सा .नि सा,

आवडले का गाणे ? उदयला तरी नक्कीच आवडलेले दिसते आहे.पण त्याला "राग" व "लोभ" या दोन्हीशी काहीच "देणे-घेणे" नाही.मला आहे.

"राग" तर सांगीतला.आता "लोभ" असलेल्या "लोभस" नायिकेबद्दल सांगतो."नायिकेत जास्त गुंतू नकोस,गाण्याचा आस्वाद घे" असे उदय म्हणाला खरा ! पण मला काही रहावत नाही. सांगतोच या नायिकेबद्दल !

२०० पेक्षा जास्त हीट फिल्म्स देणारी,तमिळमधे "अभिनय सरस्वती" व कानडीत "Kannadathu Paingili(Kannada's Parrot)" म्हणून ओळखली जाणारी,सहा दशके कानडी व तेलगू सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी, ही कर्नाटकची बेंगरूळी नायिका "सरोजादेवी" ! तिने एम.जी. रामचंद्रन बरोबर २६ व शिवाजी गणेशन बरोबर २२ सुपरहीट चित्रपट दिले होते.आहे का आवाज ?

१९५५ साली,वयाच्या सतराव्या वर्षी "महाकवी कालिदास" या कानडी सिनेमात काम सुरू केलेल्या या नायिकेने सारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती व पोलिस इनस्पेक्टर पिताश्री श्री.भैरवप्पा यांचे स्वप्न साकार केले होते. नृत्य शिकताना तिचे पाय दुखायचे तर हा बाप त्याची मनोभावे माॅलिश करून द्यायचा.आई मुलूखाची कडक ! जन्मभर तिने मुलीला

बिनबाह्यांचे पोलके वा बिकीनी घालू दिली नाही.

पण हे "झाकले माणिक" चमकायचे थोडेच थांबणार ? ते पैगाम(दिलीपकुमार,१९५९), ससुराल(राजेंद्रकुमार,१९६१),बेटी-बेटे(सुनिलदत्त,१९६४),प्यार किया तो डरना क्या(शम्मीकपूर, १९६३) या चित्रपटांमधे झळकलेच.तिने Enga Veettu Pillai (1965) व Anbe Vaa (1966) या तमिळ चित्रपटांमधे घातलेल्या साड्यांचा "हट्ट" धरणारी दाक्षिणात्य स्त्री त्या काळी सर्वत्र सापडत असे.

तिच्या या चित्रपटसेवेची मोठीच दखल घेतली केली.वाचा.

1."Saroja Devi" chaired film juries: the 45th National Film Awards and the 53rd National Film Awards jury.

2.She served as the vice-president of Kannada Chalanchitra Sangha, and as a member of Tirumala Tirupati Devasthanams's local advisory committee.

3.She also served as the Chairperson of the Karnataka Film Development Corporation,which had been set up as a private limited company by her and a few other film personalities in 1972.

4.National awards

- 2008 Lifetime Achievement Award by the Government of India, as a part of the celebrations of India's 60th independence day.

- 1992 Padma Bhushan

- 1969 Padma Shri

State awards

- 2009 - Kalaimamani Lifetime achievement award by the Government of Tamil Nadu

- 2009 - Dr. Rajkumar Lifetime Achievement Award by the  Government of Karnataka

- 2009 - NTR National Award from  Government of Andhra Pradesh for the second time for the year 2009

- 2001 - NTR National Award from Andhra Pradesh Government for the year 2001

- 1993 - Tamil Nadu Government's MGR Award

- 1988 - Karnataka Government's Rajyothsava award

- 1980 - Abhinandana-Kanchana Mala award by Karnataka State

- 1969 - Tamil Nadu State Film Award for Best Actress for Kula Vilakku

- 1965 - Abhinya Saraswathy honor by Karnataka

Other awards

- 2009 - Natya Kaladhar Award— Tamil cinema, by Bharat Kalachar Chennai

- 2007 - NTR award for remarkable achievement by Karnataka Telugu Academy

- 2007-Rotary Sivaji Award by the Charitable Trust and Rotary Club of Chennai

- 2006 Honorary Doctorate from  Bangalore University

- 2006 Vijay Award for Contribution to Tamil Cinema

- 2003 Dinakaran award for All-round Achievement

- 1997 Lifetime achievement awards by Cinema Express in Chennai

- 1994 Filmfare Lifetime Achievement Award – South

- In 2010, Bharathiya Vidya Bhavan  instituted Padma Bhushan B. Saroja Devi National Award, a lifetime achievement award to honour artists in the field of performing arts, annually.The recipients of the award including K.J.Yesudas,Vyjayantimala,  Anjali Devi,Ambareesh,Jayanthi and others.

अशी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील महाराणी !

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page