top of page

"राग शुध्द कल्याण - दिल का भंवर करे पुकार"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 4 min read

"राग शुध्द कल्याण - दिल का भंवर करे पुकार"

©दिलीप वाणी,पुणे

मंगला अबड(जैन) ने सादर केलेले "तेरे घर के सामने" या चित्रपटातले अप्रतिम केमेस्ट्री जमलेल्या देव आनंद व नूतनचे बहारदार युगलगीत ऐकून

मोहम्मद रफ़ी व किशोरकुमार यांच्याबद्दल देव आनंदने व्यक्त केलेले मत आठवले.देव आणि किशोरदा हे काँबिनेशन कितीही हीट असले तरी पन्नास-साठच्या दशकात रफींनी देवसाठी गायलेली गाणीही तेवढीच अप्रतिम आहेत.एका मुलाखतीत रॅपिड फायर राऊंड मध्ये "रफी की किशोर" असे देवला विचारले तेव्हा तो म्हणाला, "दोनो" ! रफीसाब ट्रेंड सिंगर थे ! जब गझल का फील या साॅफ्ट गाने बनते थे तब नो डाऊट रफी! आज अशी आणखी काही गाणी ऐकवतो. पहिल्यांदा "राग शुध्द कल्याण" मधे सचिन देव बर्मन यांनी स्वरबध्द केलेले "दिल का भंवर करे पुकार" हे मजरूह सुलतानपुरी यांचे गीत ऐका !

या गीताच्या आधीचा देव आनंद व नूतनचा संवाद

त्यांच्यातील अप्रतिम केमेस्ट्री समजण्यासाठी ऐकणे आवश्यक आहे.नूतनचे ते "लाडीक विभम्र" अभ्यासण्यासारखे आहेत.दाखवतो थांबा.

प्यार का राग सुनो

प्यार का राग सुनो रे उ उ उ

फूल तुम गुलाब का, क्या जवाब आपका

जो अदा है, वो बहार है

आज दिल की बेकली, आ गई ज़बान पर

बात ये है, तुमसे प्यार है

दिल तुम्हीं को दिया रे

प्यार का राग सुनो रे उ उ उ

दिल का भंवर करे पुकार

प्यार का राग सुनो

प्यार का राग सुनो रे उ उ उ

चाहे तुम मिटाना, पर न तुम गिराना

आँसू की तरह निगाह से

प्यार की उँचाई, इश्क़ की गहराई

पूछ लो हमारी आह से

आसमाँ छू लिया रे

प्यार का राग सुनो रे उ उ उ

दिल का भंवर करे पुकार

प्यार का राग सुनो

प्यार का राग सुनो रे उ उ उ

इस हसीन उतार पे, हम न बैठे हार के

साया बन के साथ हम चले

आज मेरे संग तू, गूँजे दिल की आरज़ू

तुझसे मेरी आँख जब मिले

जाने क्या कर दिया रे

प्यार का राग सुनो रे उ उ उ

दिल का भंवर करे पुकार

प्यार का राग सुनो

प्यार का राग सुनो रे उ उ उ

उ उ उ

आता "राग शुद्ध कल्याण" ची तांत्रिक माहिती सांगतो.

स्वर - मध्यम और निषाद वर्ज्य

आरोह में,अवरोह में - मध्यम तीव्र,शेष शुद्ध स्वर !

जाति - औढव - सम्पूर्ण वक्र

थाट - कल्याण

वादी,संवादी - गंधार/धैवत

समय - रात्रि का प्रथम प्रहर

विश्रांति स्थान - सा ग प - प ग सा;

मुख्य अंग - ग रे ग ; रे सा ; ,नि ,ध ,प ; ग रे सा ; ग रे ग ; प रे सा;

आरोह-अवरोह - सा रे ग प ध सा' - सा' नि ध प म् ग रे सा; ग रे ग प रे सा;

विशेष: आरोह में माध्यम और निषाद वर्जित होता है। इसे मन्द्र एवं मध्य स्वर से गाया बजाया जाता है। तीव्र मध्यम का प्रयोग पंचम से गंधार में आते समय मींड़ के साथ लिया जाता है।

आता ५० आणि ६० च्या दशकापर्यंतली रफींनी देवसाठी गायलेली काही सोलो गाणी पेश करतो.

१.गाईड - टूरीस्ट गाईड राजूच्या आयुष्यात रोझी येते जी दिसायला सुंदर,नृत्यनिपुण असते पण नवर्‍याकडुन पूर्ण दुर्लक्षित असते.राजूच्या उत्तेजनामुळे तीची यशस्वी नृत्यांगना होण्याकडे वाटचाल सुरु होते. सामाजिक बंधन झुगारुन दोघे एक होतात - तेरे मेरे सपने अब एक रंग है..

रोझी उत्तम नृत्यांगना तर बनते.पण पैसा, प्रसिध्दीमुळे त्यांच्यात काही कारणाने बेबनाव होतो.त्या दोघांमधला संवाद तुटतो.देवला हा विरह, दुरावा असह्य होतो - दिन ढल जाए हाए रात जाए..

२.तेरे घरके सामने - देवची नूतन एवढी बेस्ट जोडी अन्य कोणाबरोबरही नाही.रात्रीच्या निरव शांततेत रफींचे हे मधाळ स्वरातले गाणे...देव नूतनची केमिस्ट्री केवळ शब्दातीत - तू कहाँ ये बता इस नशीली रातमें..आणि दिलका भँवर करे पुकार..

३.बात एक रात की - एक सस्पेन्स थ्रीलर...राजेश (देव आनंद) पेशाने वकील असतो.पण अगदी "दिलफेक,मस्तमौला! "अकेला हूँ मैं, इस दुनियामें,कोई साथी है तो मेरा साया" ..गात गात हातात फिशिंग स्टीक घेऊन सायकलवरुन जाताना त्याच्यावरुन नजर हटत नाही.."न तुम हमें जानो न हम तुम्हे जाने..हे गीतही (हेमंत कुमार/सुमन कल्याणपूर) अप्रतिम आहे..

४.माया - एक श्रीमंत बिझिनेसमन भ्रमनिरास झाल्याने त्याचा ऐषोआराम सोडून गरीब वस्तीत येऊन रहातो आणि जीवनाचा खरा अनुभव घेतो अशी काहिशी कथा आहे. यातील सलिल चौधरींची सर्वच गाणी ऐकण्यासारखी..या गाण्यात अंतर्‍याच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन ओळीतले व्हेरीएशन खासच!

- कोइ सोनेके दिलवाला कोई चांदीके दिलवाला..

५.हम दोनो - कभी खुदपे कभी हालातपे रोना आया.. या गाण्यातील "लायटर थीम" खूप प्रसिध्द झाली.संगीतात नवनवीन प्रयोग करण्याचा ध्यास घेतलेल्या "केरसी लाॅर्ड" या वादक अरेंजरनी "जर्मन" आर्केस्ट्रा मधल्या "ग्लॉकरसील" या वाद्याचा प्रयोग "हम दोनो" च्या "मैं जिंदगीका साथ निभाता चला गया" या गाण्यात "लाईटर थीम" मध्ये केला.वेळ आली की "अरेंजर" मंडळींच्या अशा अगेक गमती-जमती पुढे सांगेन.

६.कालापानी - देव हे गाणे नायिकेच्या वियोगात म्हणत नसून गैरसमजूतीने अटक झालेल्या आणि काळ्यापाण्याची सजा झालेल्या आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी एका शायरच्या वेशात खर्‍या खुनाच्या शोधात एका कोठ्यावर आला असतो. नलिनी जयवंतची...कोठेवालीची छोटी पण महत्वाची भूमिका आहे - हम बेखुदीमें तुमको पुकारे चले गए...

७.काला बाजार - देव आणि त्याचा साथीदार कालू (रशिद खान) वर चित्रित "तेरी धूम हर कहीं, तुझसा यार कोई नहीं..हे धमाल गाणे आहे..पैसा कसा महत्वाचा आहे हे सांगणारे गाणे...तेरी धूम हर कहीं तुझसा यार कोई नहीं..

८.तीन देवियाँ - ऐसे तो ना देखो के हमको नशा..

९.काला बाजार - दरवेळी "उपरवाला" म्हणताना रफींचे व्हेरीएशन आणि ते म्हणताना देवचा मिश्किलपणा..यातले जास्त काय आवडलं हे आपण सांगूच शकत नाही.

- खोया खोया चांद खुला आसमान

- अपनी तो हर आह एक तूफान है

१०.बंबईका बाबू - "O Henri च्या "Double Died Deceiver" या लघुकथेवर आधारीत असा

या सस्पेन्स थ्रीलर !

- साथी ना कोई मंजिल..

देवच्या यशात सचिनदांचा मोलाचा वाटा आहे. इतक्या विविध मूडची गाणी रफींनी अशी कौशल्याने गायली आहेत की देव उसन्या आवाजात गातोय असे वाटतच नाही ! असो. तुम्ही गाण्यांचा आनंद घ्या!

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page