top of page

"राग यमन - छलकाए जाम,आईए आप की आँखों के नाम"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 2 min read

"राग यमन - छलकाए जाम,आईए आप की आँखों के नाम"

©दिलीप वाणी,पुणे

गटावर नव्याने दाखल झालेला नविन संगीतप्रेमी मनजीतसिंग रोज रात्री "मेरे हमदम मेरे दोस्त" या चित्रपटातील "छलकाये जाम,आईये आप की आँखों के नाम" हे गाणे ऐकत ऐकत दोन पेग रिचवतो व मगच निद्रादेवीच्या अधिन होतो हे वाचून माझे कुतूहूल जागृत झाले व मी या गीताचा अभ्यास केला.मजरूह सुलतानपुरी रचित व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी "राग यमन" मधे स्वरबध्द केलेल्या या गीतात मोहम्मद रफीने अशी काय जादू केली आहे ? वाचा.

छलकाये जाम,आईये आप की आँखों के नाम, होठों के नाम

फूल जैसे तन पे जलवे ये रंग-ओ-बू के आज जाम-ए-मय उठे

इन होठों को छू के लचकाईये शाख-ए-बदन, महाकाईये ज़ुल्फों की शाम

आप ही का नाम लेकर पी है सभी ने

आप पर धड़क रहे हैं प्यालों के सीने

यहाँ अजनबी कोई नहीं,ये है आपकी महफ़िल तमाम

कौन हर किसीकी बाहें बाहों में डाल ले

जो नज़र नशा पिलाए,

वो ही संभाल ले दुनिया को हो औरों की धून, हमको तो है साकी से काम

पडद्यावर शर्मिला व धर्मेंद्र यांनी साकारलेले हे गीत

केवळ अप्रतिम आहे.उदयला ते का आवडलेले नाही हे मला कळलेले नाही.मनजीतसिंग गटावर आल्यापासून गीतांना मनोरंजनाबरोबरच शास्त्रीय उंची देखील प्राप्त झाली आहे,हे पाहून आनंद होतो आहे.त्यामुळे उदयने कधी नव्हे ते आता गीता बरोबरच "राग" सांगायला देखील सुरूवात केली आहे.अजच त्याने "राग दीपक व मल्हार" मधील "अंग लग जा बालमा" हे गीत सादर केले आहे.पूर्वी बंड्या व दीप्या पक्षांची शास्त्रीय नावे न सांगताच पक्ष्यांचे फोटो पाठवत असत.त्यामुळे त्या फोटांचा पुरेपुर रसास्वाद घेता येत नसे.आता मात्र ते आपल्या फोटोंबरोबर शास्त्रीय नावे देत असल्याने रसग्रहण शक्य झाले आहे.आता गीतांचे "राग" सांगीतल्यास त्यांचे देखील रसग्रहण करणे शक्य होत जाईल.

टोपीने "आलापांचे रसग्रहण" हे चांगले "नविन सदर" सुरू केले आहे.जया,सपना,दीप्या इ.मित्रांनी त्यात चांगला सहभाग घेतला आहे.हे सदर असेच पुढे चालू रहायला हवे.माझ्या सारख्या संगीत क्षेत्रातील अनेक "नवागतां" ना त्याचा फारच आनंद मिळेल.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page