top of page

"भारतीय रागदारी - भाग ५"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 2 min read

"भारतीय रागदारी - भाग ५"

©दिलीप वाणी,पुणे

"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्या" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.

"काफी थाटातील राग"

भातखंडे पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणातील "काफी" हा थाट, त्यातून निघणार्‍या रागांच्या मोठ्या संख्येमुळे सर्व थाटांत मोठा मानला जातो.

दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ग्रंथांत त्याला ‘खरहरप्रिया’ ‘हरप्रिया’ किंवा ‘श्रीराग मेल’ अशी नावे आहेत. गंधार, निषाद हे दोन स्वर कोमल व बाकीचे शुद्ध, असे या थाटाचे सर्वसामान्य स्वरूप असले, तरी या थाटातील काही रागांत गंधार, निषाद यांचे शुद्ध भेद व धैवत या स्वराचा कोमल भेद यांचा उपयोग झालेला आढळतो.

काफी थाटीतील प्रमुख राग : (१) काफी (२) सैंधवी किंवा सेंधवी अथवा सिंदूरा (३) धनाश्री (४) धानी (5) भीमपलासी (६) हंसकिंकणी किंवा हंसकंकणी (७) पददीपकी किंवा पटदीपकी वा प्रदीपकी (८) पटमंजरी (९) बागेश्री (१०) शहाना, शाहना किंवा सहाना (११) नायकी (१२) सूहा (१३) सुघराई (१४) देवसाख किंवा देवसाग (१५) पीलू (१६) बहार (१७) बिंद्रावनी सारंग (१८) मधमाद सारंग किंवा मध्यमादी सारंग (१९) बडहंस सारंग (२०) सामंत सारंग (२१) मियां की सारंग (२२) शुद्ध सारंग (२३) लंकदहन सारंग (२४) मल्लार (शुद्ध) (२५) गौड मल्हार (२६) मेघ मल्हार (२७) मियां की मल्हार (२८) मीरा की मल्हार (२९) नट मल्हार (३०) सूर मल्हार (३१) चरजू की मल्हार (३२) चंचलसस मल्हार (३३) रामदासी मल्हार.

रागांग पद्धतीनुसार या रागांचे वर्गीकरण करता येते व ते पुढीलप्रमाणे :

(१) काफी अंग : काफी, सैंधवी, पीलू.

(२) धनाश्री अंग : धनाश्री, धानी, भीमपलासी, हंसकिंकिणी, पटदिपकी.

(३) कानडा अंग : बहार, बागेश्री, सूहा, सुघराई, नायकी, सहाना, देवसाख

(४) सारंग अंग : शुद्ध सारंग, मधमाद सारंग, बिंद्रावनी सारंग, बडहंस सारंग, सामंत सारंग, मियां की सारंग, लंकदहन सारंग, पटमंजरी (काफी मेलजन्य प्रकार).

(५) मल्हार अंग : शुद्ध मल्लार, गौड मल्हार, मियां की मल्हार, सूर मल्हार, मेघ मल्हार, रामदसा मल्हार, चरजू की मल्हार, चंचलसस मल्हार, मीरा की मल्हार, नट मल्हार.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page