"भारतीय रागदारी - भाग - १४"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - १४"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्यां" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.या लेखमालेवर उदयने आधीच "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.पण कधी नव्हे ती अंजली मंगरूळकर या विषयावर बोलती झाली आहे.तेव्हा ऐका तर खरं ! ती काय सांगते आहे ते ! भारतीय रागदारीमधे काय वैशिष्ट्य असते संगीतकारांचे ? वाचा.
टोपी,दीप्या व उदय हे संगीत रसिक ! पण "अट्टल" नसावेत.काही अट्टल रसिकांना सगळेच संगीतकार ओळखू येतात किंवा पाठ असतात.माझ्या एका मित्राला आणि त्याच्या वडिलांना कोणत्याही गाण्याचे संगीतकार पाठ असायचे.आदरच वाटायचा एकदम त्यांच्याबद्दल !
"सैराट" मधील अजय अतुल यांनी त्यांच्या गाण्यात पारंपारिक ढोल ताशे यांच्या बरोबरच वेस्टर्न वाद्यांचाही छान मेळ बसवलाय.जसा संगीतकार "हुस्नलाल भगतराम" ह्यांनी बाॅलीवूडमधे "पंजाबी ठेका" आणला,तसाच हा "मराठी ठेका" ! ए.आर.रेहमान "चेलो(cello)" या वाद्याचा खुप सुंदर उपयोग करतो गाण्यांमध्ये ! हा चेलो म्हणजे व्हायोलिनचा मोठा भाऊ,जो दोन पायांमध्ये घेउन वाजवितात ! तर शिवहरीचे संगीत म्हणजे बासरी व संतूरची लयलूट ! तर नौशाद साहेबांच्या संगीता मध्ये सितार आणि हार्मोनियम यांचा खुप वापर !
खय्यामांचा "पहाडी" या "रागा" वर जोर असायचा.
तर नौशाद साहेबांना "ठुमरी" पसंत ! तर वसंत देसाई वेगवेगळ्या ताल वाद्यांसाठी प्रसिद्ध होते.
तर अवघड चाल + अवघड ताल = स्वर्गीय गाणी = खळेकाका हे एक वेगळेच समीकरण !




Comments