गोलापुरब(गोल्हारे) वाणी
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "गोलापुरब(गोल्हारे) वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
"गोलापुरब(गोल्हारे) वाणी" हे नाव "गोला(धान्याचा बाजार)" या शब्दावरून आले असून ते मूळचे "बुंदेलखंड" चे व सध्या उत्तरप्रदेश मधील "झाशी" ला स्थायिक झालेले वाणी !
इ.स.१५० च्या सुमारास दक्षिण गुजरात मधील अहमदनगर प्रांत "लाड" देश किंवा "लाट" देश या नावाने ओळखला जात असे. येथून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले, “लाड सका वाणी” लोकांपासून वेगळे असलेले हे "लाड वाणी" लोक बलाते, चव्हाण, चिखले, चौधरी, गोसावी, झरे, कराडे, खेले, मोदी, पैठणकर, शेटे अशी अस्सल मराठी आडनावे लावतात.
तुळजापूरची भवानी,साताऱ्याजवळील शिंगणापूरचा महादेव,पंढरपूरचा विठोबा ही त्यांची आराध्य दैवते आहेत.
गुजरात मधील "पेतलाड" येथील "आशापुरी(अश्णाई) माता" ही त्यांची कुलदेवता आहे.
"देशस्थ" किंवा "खेडवळ" ब्राह्मण हे त्यांचे पुरोहित असतात व काही रितीरिवाज ब्राह्मणासारखे तर काही रितीरिवाज कुणबी लोकांसारखे असतात.
"गोलापुरब(गोल्हारे) वाणी" लोकांचे धर्मग्रंथ "संस्कृत" भाषेत लिहिलेले नसून "प्राकृत" भाषेत लिहिलेले असतात.
"लाड वाणी" लोकांचे "दसा" व "बिसा" असे दोन उपगट असतात. एकाच आडनावाचे लाड वाणी लोक विवाह करू शकतात, पण त्यांचे नाते संबंध(Sameness of family-stock) असता कामा नये.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments