"भारतीय रागदारी - भाग - १४अ"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी - भाग - १४अ"
©दिलीप वाणी,पुणे
अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी एका विशिष्ट "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" हे गाणे अभ्यासासाठी घेऊ या.कशाची आठवण होते हे गाणे ऐकून ?
शंकर एहसान लाॅय या संगीतकारांनी ते "दिगंबरा हो दिगंबरा" या दत्ताच्या लोकप्रिय आरतीच्या चालीवर बांधलेले हे गाणे आहे.दोन्ही गाण्यांचा "राग" एकच ! कोणता ? भारतीय "रागदारी" मधे संगीतकारांबरोबरच गीतकारांचे काय वैशिष्ट्य असते ? वाचा "कजरा रे कजरा रे" या गाण्याच्या
गीतकाराबद्दल !
मोगर्याचा सुगंध जसा आपल्याला प्रसन्न करतो; गुलाबाच्या पाकळ्या साखरेत मुरल्यानंतर जशी गुलकंदाची लज्जत वाढते आणि असा गुलकंद जिभेवर ठेवल्यानंतर जो आनंद मिळतो; तोच आनंद, तेच समाधान "गुलजार" यांचे गीत, काव्य ऐकताना मिळते.मानवी भावनांना विविधांगी रूपकांचा आगळा साज चढवून त्याला आशयघन उपमांचे कोंदण लावत ते काव्य फुलवणे, हा गुलजार यांच्या लेखणीचा बाज.
या बाजातून उतरलेल्या अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. गुलजार यांचा मूळ पिंड लेखकाचा. मानवी मनाचे खेळ अगाध. हे मनाचे खेळ टिपण्यात गुलजार यांचा हात कोणीच धरू शकत नाही. किंबहुना, गुलजार यांच्या संवेदनशील लेखणीने या खेळाचा रंग अधिक वाढतो. मग रसिकांना हा शाब्दिक जिव्हाळ्याचा रसाळ, मधाळ गुलजारी गुलकंद तृप्त करतो. बरे ही गाणी एकदा ऐकून समाधान होत नाही. पुन:पुन्हा ऐकताना दरवेळी त्यातील शब्दांचा नवा भाव, नवा अर्थ, नवा संदर्भ गवसतो. गुलजार यांच्या गीतांची जादूच अशी अनोखी, मुरलेल्या गुलकंदासारखी.
अंजली मंगरूळकरने उदाहरण म्हणून दिलेले "कजरा रे कजरा रे" हे गुलजार यांचे गाणे आधी वाचा.त्याचा "राग" ओळखा.मग ज्या रागावर हे गाणे बेतलेले आहे त्याच रागातले "दिंगबरा हो दिगंबरा" पण ऐकवतो.वाचा.
ऐसी नज़र से देखा
उस ज़ालिम ने चौक पर
हमनें कलेजा रख दिया
चाकू की नोक पर
मेरा चैन-वैन सब उजड़ा
ज़ालिम नज़र हटा ले
बर्बाद हो रहे हैं जी
तेरे अपने शहर वाले
मेरा चैन-वैन...
मेरी अंगड़ाई, ना टूटे, तू आजा
कजरा रे कजरा रे
तेरे कारे कारे नैना
हो मेरे नैना मेरे नैना
मेरे नैना जुड़वाँ नैना
हो कजरा रे...
सुरमें से लिखे तेरे वादे
आँखों की ज़बानी आते हैं
मेरे रूमालों पे लब तेरे
बाँध के निशानी जाते हैं
हो तेरी बातों में किमाम की खुशबू है
हो तेरा आना भी गर्मियों की लू है
आजा टूटे ना, टूटे ना अंगड़ाई
हो मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा
कजरा रे...
आँखें भी कमाल करती हैं
पर्सनल से सवाल करती हैं
पलकों को उठाती भी नहीं, हम्म
परदे का ख्याल करती हैं
हो मेरा ग़म तो किसी से भी छुपता नहीं
दर्द होता है दर्द जब चुभता नहीं
आजा टूटे ना, टूटे ना अंगड़ाई
हो मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा
कजरा रे...
हो तुझसे मिलना पुरानी दिल्ली में
छोड़ आये निशानी दिल्ली में
पल निमा राज़े दरी बे-तलब
तेरी-मेरी कहानी दिल्ली में
काली कमली वाले को याद कर के
तेरे काले-काले नैनों की क़सम खाते हैं
तेरे काले-काले नैनों की बलाएँ ले लूूँ
तेरे काले नैनों को दुआऐं दे दूँ
मेंरी जान उदास हैं, होठों पे प्यास हैं
आजा रे, आजा रे, आजा रे हो
तेरी बातों में...
कजरा रे...
आता याच "रागा" त बेतलेली ही दत्त दिगंबरांची लोकप्रिय आरती ऐका.
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो दत्तगुरुंचे भजन करा ॥
हे नामामृत भवभय हारक । अघसंहारक त्रिभुवन तारक ।
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया । अमोल ठेवा हाती धरा ॥१॥
दत्तचरण माहेर सुखाचे । दत्तभजन भोजन मोक्षाचे ॥
कवच लाभता दत्तकृपेचे । कळी काळाचे भय न धरा ॥२॥
हा उत्पत्ति स्थिती लय कर्ता । योग ज्ञान उदगाता त्राता ॥
दत्त चरित मधु गाता गाता । भव सागर हा पार करा ॥३॥
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
आता अंजली मंगरूळकरने पाठविलेला VDO परत पहा.गुलजार यांनी बांधलेले "कजरारे" हे "प्रेमगीत" त्याच रागात बांधलेल्या "भक्तीगीत" सारखेच आहे.पहा गुणगुणून !




Comments