top of page

"भारतीय रागदारी - भाग - २०"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 1 min read

"भारतीय रागदारी - भाग - २०"

©दिलीप वाणी,पुणे

माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आज स्त्रिलिंगी नाव धारण करणार्‍या "रागा" ला "रागिणी" असे म्हणायचे का ? याचा अभ्यास करतो व सांगतो.

घरातील "कर्ता पुरूष" म्हणून तीर्थरूपांनी मला "हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती" या संस्थेत "जोर-बैठका" मारायला पाठवले."कर्ता पुरूष" म्हणून आईने मला कधीही तिच्या "हार्मोनियम" ला हात लावू दिला नाही.पण निसर्गाने मला जन्मत: "कानसेन" बनवलेले असल्याने माझी पाऊले व्यायामशाळेशेजारी भरणार्‍या "बासरी क्लास" कडे वळली व "कचाने संजीवनी विद्या" प्राप्त करावी तसा मी घरच्यांना चोरून संगीत शिकू लागलो.

बरोबरचे विद्यार्थी सगळे मध्यमवयीन ! त्यामुळे त्यांची ग्रहणशक्ती माझ्यापेक्षा खूपच कमी ! त्यामुळे महिनाभरातच मी अनेक "सुरावटी" आत्मसात केल्या.मास्तरांनी तीर्थरूपांकडे माझे कौतुक केले.त्यांनी न रागावता उलट मला "बालमोहन" कंपनीची ब्रासची महागडी बासरी घेऊन दिली.मग काय ? इतके दिवस लपून-छपून चाललेल्या माझ्या संगीत साधनेला "गृहमान्यता" मिळाली.आईने व शेजारच्या निजसुरे काकूंनी "हार्मोनियम" चे प्राथमिक धडे द्यायला सुरूवात केली. तेवढ्यात तीर्थरूपांची नांदेडला बदली झाली व माझी "संगीत साधना" कायमची थांबली.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page