भारतीय स्वातंत्र्यलढा
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे विसावे शतक"
इसवी सनाच्या "विसाव्या" शतकात "भारतीय स्वातंत्र्यलढा" चांगलाच शिगेला पोहोचला होता. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी २ एप्रिल १९०४ रोजी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री.नरहर गोपाळ अलई उपाख्य “बागलाणचे बाबा" यांनी "लोकमान्य टिळक" यांची जाहीर सभा "नामपूर" येथे आयोजित केली.
त्यासभेत जाहीर केल्याप्रमाणे,परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी,त्यांनी आपल्या घरी १०० चरखे व २५ हातमाग बसवून त्यावर "सूतकताई" चालू केली.तसेच लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला "आर्थिक मदत" मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या "राष्ट्रीय फंडा" ला भरघोस आर्थिक मदत केली.भावी पिढीत "राष्ट्रीय विचार" निर्माण करण्यासाठी "श्री.बाळूकाका कानिटकर" यांनी पुण्याजवळील "चिंचवड" येथे स्थापन केलेल्या "राष्ट्रीय सेवा मंडळ" याला देखील भरघोस आर्थिक मदत केली व बागलाणातील स्थानिक लोकांकडूनही निधी मिळवून दिला.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांनी स्वतः "असहकार व कायदेभंगा" च्या चळवळीत सहभाग घेतला. तसेच "भिलवडी" चा जंगल सत्याग्रह घडवून आणला. ते स्वतः "कोंडवाडे फोडण्या" च्या आंदोलनात सहभागी झाले. तसेच "सारावाढ विरोधी आंदोलन" देखील यशस्वीरीत्या चालवले.
या "सारावाढ विरोधी आंदोलना" च्या यशस्वीतेमुळे "नामपूर" शहर संपूर्ण भारतात महाराष्ट्राची "बार्डोली" म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वतः सरदार "वल्लभभाई पटेल" यांनी मार्गदर्शनासाठी "नामपूर" ला येउन या "सारावाढ विरोधी आंदोलना" ला पाठींबा जाहीर केला.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
コメント