"मणिपूर संघर्षामागचे अतिरेकी - भाग ५६"
- dileepbw
- Sep 6, 2023
- 2 min read
"मणिपूर संघर्षामागचे अतिरेकी - भाग ५६"
वरवर "हिंदू-ख्रिश्चन धार्मिक संघर्षा" चे स्वरूप धारण केलेल्या मणिपूर संघर्षाला रोज नवनवीन आयाम प्राप्त होत आहेत.जयाने पाठवलेला "खनिज संपत्ती" चा व "आदिवासी शोषणा" चा ताजा आयाम या पूर्वी कधीही ऐकलेला नव्हता. त्या आयामाच्या संदर्भात मणिपूरधील विविध आदिवासींचा अभ्यास करून होत नाही तोपर्यंत मणिपूर संघर्षामागे अफूशेतीचे अर्थकारण व त्यात असलेला म्यानमारच्या "अतिरेक्यांचा सहभाग" कानावर आल्याने त्यांचा अभ्यास सुरू केला.सांगतो क्रमश: !
आधी आपल्या मातृसंस्थेचा विद्यार्थी असलेला पुण्यातील ज्येष्ठ भूलतज्ञ डाॅ.अदनान अली सरकार,या अतिरेक्याची माहिती सांगतो.वाचा.
भारतीय गुप्तचर खात्याने "महाराष्ट्र ISIS मॉडेल,पुणे" या नावाने कार्यरत असलेल्या संघटनेच्या सहा अतिरेक्यांना आतापर्यंत अटक केली असून त्यात बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS,MD(Anaesthesiology) केलेल्या व गेली पंधरा वर्ष नवले रूग्णालय व नोबेल रूग्णालय येथे कार्यरत असलेल्या भूलतज्ञ डाॅ.अदनान अली सरकार,कोंढवा,पुणे यांचा समावेश आहे.त्यांच्याकडून ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी एनआयएने ३ जुलै रोजी मुंबई,ठाणे आणि पुणे येथून तबिश नासिर सिद्दीकी,जुबेर नूर मोहम्मद शेख, शरजील शेख आणि जुल्फिकार अली या चार आरोपींना अटक केली होती.एनआयएने या मोहिमेला "महाराष्ट्र ISIS मॉडेल,पुणे" असं नाव दिलं आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी "आयएसआयएस" च्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता, असे तपास यंत्रणेचे मत आहे. त्यांनी "स्लीपर सेल" तयार करून अनेक तरुणांची भरती केली होती.असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.आरोपींनी परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलरच्या सूचनेनुसार ISIS चा दहशतवादी आणि हिंसाचाराचा अजेंडा पुढे नेण्यासाठी प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील लिहिली होती. ‘व्हॉईस ऑफ हिंद’ मासिकात ते प्रसिद्ध झाले होते.
गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात बसून रचल्या जात असलेल्या अनेक कटांचा पर्दाफाश केला आहे.पुणे एटीएसने गेल्या आठवड्यात मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस सैकी या दोन आरोपींना अटक केली होती.या दोघांनी आपला आणखी एक साथीदार मोहम्मद शाहनवाज याच्यासोबत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि चाचणी म्हणून पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट घडवून आणले होते.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र एटीएसने अटक केलेले आरोपी मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस सैकी हे गेल्या वर्षी चित्तौडगड येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचलेल्या एनआयए प्रकरणात वॉन्टेड आहेत.
यूपी एटीएसने महाराष्ट्र एटीएससह गेल्या पंधरवड्यात जोगेश्वरी येथून इम्रान सय्यद आणि सलमान नावाच्या दोन आरोपींना अटक केली.हे लोक पाकिस्तानची गुप्तचर संस्था "आयएसआय" साठी काम करत होते आणि गोंडा येथील त्यांच्या एका साथीदार मोहम्मद रईससह उत्तर-भारतातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा कट रचत होते. या तिन्ही आरोपींचा पाकिस्तानमधील हँडलर मुन्ना झिंगाडा होता, ज्याने २००० मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला केला होता.२६/११ प्रमाणेच कुलाब्याचे "Jewish centre (Chabad Lubavitch,Nariman House)" उडवण्याचा या अतिरेक्यांचा बेत होता,असे समजते.मणिपूर संघर्षामागचे अतिरेकी काय बेत करीत असावेत ?
コメント