संत महात्मे
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
कुलदेवता,मानवी मन व "संत महात्मे" यांचा परस्पर संबंध दाखविणाऱ्या काही इंग्रजी भाषेतील "पोस्ट" आपण वाचल्या.
असे काही "संत महात्मे" लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात होऊन गेले काय असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल.
खरे तर "नदीचे मूळ" व "संत महात्मे यांचे कूळ" शोधू नये असे म्हणतात.
कोणत्याही "संत महात्मे" लोकांना "जातीच्या चौकटी" त बंधू नये हे देखील खरे !
कारण "संत महात्मे" केवळ एका जातीच्या न्हवे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी जन्माला आलेले असतात.
पण केवळ सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात जन्माला आलेले,मालेगाव तालुक्यातील "चिंचवे" गावचे संत "श्री.विचारदास महाराज" यांचे कार्य आपल्यापुढे ठेवीत आहे :-
इ.स.१९४२ साली “वैष्णव” पंथाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे “शैव” भक्त श्री.वामन दामू बागडे(वाणी बुवा) उर्फ महाराज “विचारदास” यांनी जळगाव जिल्ह्यातील, चाळीसगाव तालुक्यातील "गाळणे" या गावी मठ स्थापन केला.
या मठाच्या माध्यमातून “वैष्णव” व “शैव” या हिंदू धर्मातील दोन पंथांचा समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण कार्य लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे संत “विचारदास”महाराजांनी आयुष्यभर केले.
या मठाचा "चतुर्थ वर्धापनदिन" शुक्रवार दि.२८/११/२०१४ रोजी "श्री श्री श्री १००८ श्री सिद्धयोगी महंत आनंदनाथजी महाराज" यांच्या शुभहस्ते साजरा होत असून त्याचे निमंत्रण लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधव श्री.पंकज उर्फ बाबा नेरकर यांनी सर्व भाविकांसाठी पाठविले आहे.
Comentários