"भारतीय रागदारी - भाग - ९"
Updated: Dec 3, 2023
"भारतीय रागदारी - भाग - ९"
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्यां" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.या लेखमालेवर उदयने आधीच "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.पण कधी नव्हे ती अंजली मंगरूळकर या विषयावर बोलती झाली आहे.तेव्हा ऐका तर खरं ! ती काय सांगते आहे ते !
अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी एका विशिष्ट "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" हे गाणे घेऊ या. कशाची आठवण होते हे गाणे ऐकून ? शंकर एहसान लाॅय या संगीतकारांनी ते "दिगंबरा हो दिगंबरा" या दत्ताच्या लोकप्रिय आरतीच्या चालीवर बांधलेले हे गाणे आहे.दोन्ही गाण्यांचा राग एकच !
कोणता ?
Comments