जातीची पेंढी
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील समाजसुधारणे संबंधी नवे विचार "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाने इ.स.१९४१ पासून स्वीकारले व त्यामुळे समाजाची "प्रगती" झाली. त्यामुळे "समाज जीवन" सुधारले.
हे सगळे करीत असतानाही "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाने "एकोपा" कायम ठेवला. जातीसमाजात कालानुरूप आणि कालसंवादी "परिवर्तन" होत असतानाही "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" जातीतील सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले व आपली "अस्मिता" जपली. आधुनिक काळातही "जातीची पेंढी" सुटू तर दिली नाही त्याउलट अधिक पक्की केली.
"लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजातील "जात पंचायती" चे रुपांतर परिवर्तनानुकुल अशा विविध भौगोलिक "स्थानिक मंडळां" च्या स्वरुपात केले व जातपंचायतीचा अनावश्यक प्रभाव कमी केला.
या सर्वाचे श्रेय नामपुरचे "लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाचे "समाजरत्न", परिवर्तनानुकुल, श्री.नरहर गोपाळ अलई यांना जाते. त्यामुळेच ते “बागलाणचे बाबा" या नावाने आजही लोकांच्या चिरस्मरणात आहेत.
(संदर्भ:-“बागलाणचे बाबा" पृष्ठ क्र. ५९, ६०,लेखक -प्रा.डॉ.प्रभाकर मांडे, प्रकाशक-गोदावरी प्रकाशन).
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments