top of page

सामाजिक समरसता

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "वैश्य" या वर्णाची वैशिष्ट्ये

"ग्रीक संस्कृती" मध्ये समाजाचे वर्गीकरण "Dyadoi(good)" व "KaKoi(bad)" असे केलेले आढळते.

"Dyadoi(good)" लोक गावात तर "KaKoi(bad)" लोक जनावराप्रमाणे गावाबाहेर रहात असत. कारण "KaKoi(bad)" मंडळी ही युद्धामध्ये पराभूत झालेली(जीत) मंडळी असत.त्यामुळे "KaKoi(bad)" लोकांना धार्मिक,सामाजिक,कायदेशीर असे कुठलेही अधिकार नसत. भारतीय समाज व्यवस्थेतील "शुद्र" वर्णाच्या लोकांसारखीच त्यांची परिस्थिती होती(संदर्भ:- M. de Coulanges).

"Dyadoi(good)" व "KaKoi(bad)" या दोन्ही वर्णांच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते. यावर उपाय म्हणून ग्रीक समाज व्यवस्थेने एक तोडगा काढला होता. या दोन्ही वर्णांना एकत्र बांधून ठेवणारा एक समान धागा त्यांनी शोधून काढला. तो म्हणजे "सहभोजन(Public feast/Sacrifice)" !

एकाच चुलीवर शिजवलेले,एकाच देवाला नैवेद्य दाखविलेले अन्न सणासुदीला Dyadoi (good) व KaKoi (bad) वर्णाच्या लोकांनी एकत्र बसून खाणे व KaKoi (bad) लोकांनी शहराला संरक्षण दिल्याबद्दल, "ऋणाची परतफेड" म्हणून त्यांचा "सत्कार" करणे(संदर्भ:-M. Fustel de Coulanges)!

थोडक्यात हा समारंभ म्हणजे "KaKoi(bad)" लोकांना रीतसर, समारंभपूर्वक "नागरिकत्व" बहाल करण्यासाठी असे.

(संदर्भ:-An Article on Kasai, domestic and in Themis - Miss Jane Harrison).

"सामाजिक समरसता" निर्माण करण्यासाठी "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजभूषण "बागलाणचे बाबा" श्री.नरहर गोपाळ अलई यांनी नामपूर येथे सुरु केलेला "दिवाळी सामूहिक फराळ" ही योजना सुद्धा याचेच प्रतिक आहे.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page