सोलापूर सखी मंडळ
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महिलांनी लिंगायत वाणी समाजातील महिलांचे स्वागत करण्यासाठी "सोलापूर सखी मंडळ" या सामाजिक समरसता मंडळाची स्थापना केली असून या मंडळातर्फे मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर "तीळगुळ घ्या गोड बोला" या सामाजिक समरसतेच्या समारंभाचे आयोजन केले आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाज व लिंगायत वाणी समाज यांचा परस्परांविषयी असणारा स्नेहभाव अधिकच वृध्दींगत करण्यासाठी सोलापूर सखींनी हा हळदीकुंकू आणि वाण वाटप समारंभ आयोजित केला आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी "सोलापूर सखी मंडळ" या संस्थेने खालील आवाहन केले आहे :-
"जानेवारी" हा सखींसाठी "खास महिना" !
त्यासाठी आपण घेऊन येत आहोत "सौभाग्याचे लेणे" हा "सोलापुर सखीं" साठी
खास कार्यक्रम !
या मध्ये एक "स्पर्धा" घेण्यात येईल.या स्पर्धेच्या अंतीम विजेत्या सखीला देण्यात येईल:-
*🌹पैठणी 🌹*
चला तर मग सखींनो आपली नावे लवकरात लवकर खाली दिलेल्या सखींकडे त्वरीत नोंदवण्यास !
"सोलापूर सखी मंडळ" हळदी कुंकूचा कार्यक्रम"
दिनांक - २२/०१/२०१७
ठिकाण - उत्कर्ष मंगल कार्यालय,विजय नगर,सिडको,नाशिक
नोंदणीची अंतीम मुदत:- २० जानेवारी,२०१७
आपल्या माहितीत जर कोणी लिंगायत वाणी समाजातील "सोलापूर सखी" असेल तर कृपया त्यांना सुध्दा या स्पर्धेत सहभागी होण्यास प्रवृत्त करा.
१. सौ.गायत्री जितेंद्र सोनजे ९०११९९४०५१
२.सौ. श्यामल प्रशांत येवले
मो.९८९०५७३९७७
३.सौ. पौर्णिमा राजेंद्र पुरकर
मो. ९४०५३५९९०६
लाड सका(शाखीय) वाणी समाज व लिंगायत वाणी समाज यांचा परस्परांविषयी असणारा स्नेहभाव अधिकच वृध्दींगत होण्यासाठी व एकसंध भारतीय समाज निर्माण होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या या "सामाजिक समरसते" च्या कार्यक्रमास बहुसंख्य महिलांनी सहभागी व्हावे.ही नम्र विनंती !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ८६१९)




Comments