लिंगायत वाणी वधूंची माहिती
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
"वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी व "शैव" पंथीय लिंगायत वाणी गेली काही वर्षे विवाह बंधनाने एकत्र येऊ लागले आहेत ही एकसंध भारतीय समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.
अशा कुटूंबांची,विशेषत: लाड सका(शाखीय) वाणी वराशी विवाह केलेल्या लिंगायत वाणी वधूंची माहिती संकलित करण्याचा स्तुत्य उपक्रम सौ.गायत्री जितेंद्र सोनजे,नासिक (9011994051/9028584803) यांनी सुरू केला आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महंत श्री.विचारदास महाराज यांनी प्रारंभ केलेली ही एकत्रीकरणाची चळवळ आता चांगली रूजू लागली आहे.
या चळवळीची व्याप्ती वर्धिष्णू राहो व अन्य वाणी समाजसुध्दा यात सहभागी होवोत हीच प्रभूचरणी प्रार्थना !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६०१३)




Comments