"वाणी लोकांचे वैशिष्ट्य"
- dileepbw
- Sep 19, 2022
- 3 min read
"वाणी लोकांचे वैशिष्ट्य"
लाड शाखीय वाणी समाजातील पिलखोडचे "देव" कुल व्यापारात कसे उतरले याची सविस्तर माहिती मी "देवकुल" या उपगटात दिलेली आहे.अवश्य वाचा.
एक "वाणी" सोडले तर "मराठी माणूस" सहसा व्यापार करू शकत नाहीत ,कारण एकतर रक्तात ते गुण नाहीत किंवा समाजच करू देत नाही ,कसं ते पहा.
माझ्या निरीक्षणानुसार एक परंपरा जैन ( तेरा पंथी ,श्वेतांबर , दिगंबर, मंदीर मार्गी ,) सर्व अरिहंत म्हणजे शत्रूचा नाश ,हा कोडवर्ड वापरतात ,हे जो व्यवसाय करतील त्यात दुसरा माणूस टिकू देत नाहीत ,शेतकी कीटकनाशके, कृषी केंद्र ,झुआरी डीलर्स ,किराणा ,भुसार , मेडिकल स्टोअर्स ,सर्जीकल स्टोअर्स , प्लास्टिक फर्निचर , प्लास्टिक वस्तू ची उत्पादन ,आता आता जैन राजकारण सुद्धा करु लागले आहेत ,उदा. केजरीवाल ,अमीत शहा ,तोष्णीवाल , भंडारी इ.
एक परंपरा माहेश्वरी ! हे ( लंबा तीलक मीठी जुबान) खालील आडनांवानी ओळखले जातात , लाठी ,लढ्ढा ,राठी ,काबरा,माहेश्वरी ,चांडक वगैरे ,माहेश्वरी ,डाळ उद्योग ,राईस पालिशिंग , एक्सपोर्ट,इंपोर्ट , चार्टर्ड अकाउंटंट्स, अकाउंटट फर्म ,शेअर ब्रोकर ,कमीशन एजंट इ.
एक परंपरा सिंधी हे पण S S D ,सिंधू ,सिंध किंवा विशिष्ट नावांनी ओळखले जातात ,उदा. ललवाणी ,टेकवाणी ,अडवाणी ,गेमनानी , कृपलानी ,कंपानी , किंवा मंगलामल मोतीमल,साजनदास ,खटूमल वगैरे , सिंधी कुठलाही व्यापार करतात कपडा ,किराणा ,आडत दुकान ,कमीशन एजंट , इत्यादी
गुजराती लोकांची एक पंच सभा प्रत्येक गावात असते ,तशीच बोहरी ,पारशी लोकांची पण असते , गुजराती वाणसामान , जडीबुटी,कपडा ,कोळसा , पेट्रोल पंप,राॅकेल , वगैरे व्यवसाय करतात ,बोहरी ही मुसलमान आहेत पण गुजराती बोलतात , गुजराती तच लिहीतात, आणि त्यांचं पंच मंडळ इतकं कट्टर असतं की दुसरं कोणी त्यांच्यात घुसू शकत नाहीत, ते हार्डवेअर ,अॅसीड , ब्लीचिंग पावडर , वगैरे व्यापार करतात ,पारशी ही गुजराती च बोलतात ,ते मोठं मोठी इंडस्ट्री चालवतात उदा .विक्रोळी चे गोदरेज , मुंबई चे टाटा ,शापूरजी पालन जी ,मर्झबान आदी ,रूस्तुमजी जहांगीर
एक परंपरा शिख लोकांची असते ,त्यांचे पण पंच मंडळी असते , गुरुद्वारा मध्येच ती सक्रीय असते ,ते बहुधा स्पेअर पार्टस , टेक्निकल गोष्टी , मशिनरी स्टोअर्स ,कपड्यांचा व्यापार किंवा मशीनरी व्यापार चालवतात.
एक परंपरा मुसलमान लोकांची आहे ,ते फळ फळावळ , नाशवंत वस्तू ,भाजी पाला ,चक्की ,दूध , डेअरी , बेकरी ,पाव बटर ,सर्विस इंडस्ट्री ,पंक्चर दुकान , मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सर्विसेस, सर्विस सेंटर , गाड्या रिपेअर, इ.
आता या इतक्या प्रकारचे उद्योग हे सर्व समाज करत असतात ,त्यांचे होलसेलर्स असतात ते त्यांना मदत करत असतात ,उधारीवर माल देतातच पण कमी भावात देतात आणि ते व्यापारात टिकावे अशी योजना ही करतात ,कधी काळी अचानक नुकसान झाले तर सांभाळून घेतात ,जर गाडी पलटी ,चोरी झाली ,आग लागली तर बस्तान पुन्हा बसेपर्यंत बरोबर मदत करतात ,
जेव्हा फायदा होतो तेव्हा त्यातील थोडा हिस्सा स्वतः कडे जपून ठेवतात व कधी नुकसान झाले तर त्याला वाचवतात
मराठी माणूस जर उद्योग करु धजला तर ?
१) घरातूनच दररोज डिस्करेज म्हणजे हतोत्साहित केले जाते ,आई ,बहिण ,बायको ,मुलं सर्व जण त्याची टिंगल उडवत असतात
२) त्याने नफा कमावला आईजवळ ठेवला तर आई एकतर मोठं बांधकाम करून नफा अडकवते किंवा सोनं घेते किंवा बहिणीचं घर भरते.
३)एखादा भाऊ दारु ,सट्टा ,जुगार , शेअर्स ,रांड रंडी ,ऐय्याशी इत्यादी प्रलोभनात पैसा उडवून टाकतो
४) बॅ़क, सरकारी अधिकारी, होलसेल व्यापारी, ,आडते , कारखानदार सर्व मोठी मंडळी मराठी माणूस समोर आला तर त्याला सहकार्य देत नाहीत ,उलट त्याचे पैसे अडवून बसतात ,त्याला तेजी मध्ये हवा तो माल देतच नाहीत आणि दिला तर मंदीत देतात जो विकला जात नाही ,त्याने दिली तरी लाच खात नाहीत पण एखाद्या मारवाडी सिंधी माणसाच्या हितासाठी जीव ही देतात.
मराठी माणूस ससेहोलपट होत होतं शेवटी मेटाकुटीला येतो ,हाय खाऊन व्यापार बंद करतो
हे झाले माझे निरीक्षण व वैयक्तिक अनुभव , कदाचित अजून काही बाबी असतील पण हे मात्र खरं की मराठी माणसाच्या रक्तात व्यापार नाही !




Comments