top of page

निमकारणी

  • dileepbw
  • Oct 5, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील विवाहपूर्व "निमकारणी" या प्रथेत "श्री कुलस्वामिनी जोगेश्वरी माता ट्रस्ट,नाशिक" या धार्मिक संस्थेचे सचिव श्री.राम बेणीराम बधान यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडते.

"निमकारणी" या प्रथेत नववधूला विवाहाच्या आदल्या दिवशी देवळात किंवा पुजार्‍याच्या घरी लपवून ठेवले जाते व विवाहाच्या दिवशी घरी न पाठवता पुरूषाचा वेष धारण करून परस्पर विवाह मंडपात आणले जाते. याचे कारण असावे ?

याचे कारण इसवी सनाच्या १३ व्या शतकाच्या इतिहासात सापडते.(संदर्भ:- मलिक महंमद जयासी या इतिहासकाराने इ.स. १५४० साली लिहिलेला "पद्मावत" हा ग्रंथ)

इ.स.१३०० साली राजस्थानातील मेवाड प्रांतावर "सका" वंशाचा राजा रतनसिंग यांचे राज्य होते. त्यांची द्वितीय पत्नी सिंहल राजकन्या "पद्मिनी" ही अत्यंत लावण्यवती होती. तिच्या सौंदर्याची ख्याती दिल्लीचा बादशहा "अल्ला- उद् - दिन खिलजी " याच्या कानावर गेली. त्याने "पद्मिनी"ला आपल्या जनानखान्यात सामिल करून घेण्यासाठी चितोडवर मोठ्या सैन्यानिशी स्वारी केली.

आत्मसन्मान राखण्यासाठी राणी पद्मिनीने आपल्या सख्यांसह आत्मदहन(जोहार) केले.तर राजा रतनसिंगने आपल्या मोजक्या सहकार्‍यांसह केसरी वस्त्रे व केसरी शेला धारण करून(केसरिया) रणांगणावर लढता लढता आपला देह खाली ठेवला.

चिडलेल्या "अल्ला - उद् - दिन खिलजी " व त्याच्या सैन्याने रयतेमधील महिलांची लूट सुरु केली.

त्यांच्या पासून बचाव करण्यासाठी मग ही "निमकारणी" नावाची प्रथा सुरू झाली. मुली ऐवजी मुलाचे लग्न आहे असे भासवून लाड सका(शाखीय) वाणी समाजातील तरुणींचा बचाव करण्यात आला.

कालबाह्य झाल्यामुळे लाड सका(शाखीय) वाणी समाजात आज ही प्रथा पाळली जात नाही.

"अल्ला - उद् - दिन खिलजी " व त्याच्या सैन्याने पुढे रयतेवर जे जुलूम केले त्याला कंटाळून लाड सका(शाखीय) वाणी समाज राजस्थानातून गुजरातमध्ये व मोगलाई तेथे सुध्दा पोहोचल्यानंतर गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील नंदुरबार,धुळे,जळगाव व नाशिक या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाला.

हे स्थलांतर केव्हा,कसे,कोठून कोठे झाले ते शोधणे अवघड आहे. या संबंधी कोणा लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवाकडे माहिती असल्यास त्याने ती या अभ्यास गटात अवश्य सांगावी.ही नम्र विनंती !

लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी Myheritage.com या विनामूल्य संकेत स्थळाचा उपयोग करून आपआपली वंशवेल शोधल्यास हे सहज शक्य होईल.

प्रयत्न तर करुन पहा !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६५६६)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page