विद्यार्जनासाठी परदेश गमन
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
Updated: Sep 10, 2022
हजारो वर्षे व्यापार,सावकारी व शेती हे पारंपारिक व्यवसाय करणारा "सका" वंशाचा लाड सका(शाखीय) वाणी समाज गेल्या दीड दोन शतकात विद्यार्जन व विद्यादान या क्षेत्राकडे वळाला व या क्षेत्रात देखील या समाजाने आपले भरीव योगदान द्यायला सुरुवात केली आहे.
याचा दाखला म्हणजे विद्यार्जनासाठी परदेश गमन करणार्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या !
तुलनेने हे परदेश गमन या समाजाला नवीन असल्याने या क्षेत्रात नेत्रदीपक योगदान देणार्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्यच आहे.
याची एक झलक नुकतीच नाशिक येथे पहायला मिळाली.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील आदरणीय व्यक्तिमत्वे सर्वश्री भगवान नाना खैरनार व अमरभाऊ वाणी यांनी परदेशात शिक्षणासाठी निवड झालेल्या नाशिक स्थित श्री.सुनील मुसळे यांचे सुपुत्र चि.गितेश व सुकन्या चि.कोमल यांचा सत्कार घडवून आणला.
या प्रसंगी समाजातील नेतृत्व श्री.आबासाहेब सोनजे,श्री.राजेशजी कोठावदे,श्री.गोविंदराव, श्री.प्रवीणजी अमृतकर अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
परदेशी शिकणार्या समस्त लाड सका (शाखीय) वाणी विद्यार्थ्यांची एक समग्र यादी तयार करण्याची नितांत गरज आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६२३१)




Comments