top of page

अठराव्या शतकातील लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज

  • dileepbw
  • Sep 23, 2022
  • 1 min read

इसवी सनाच्या "अठराव्या" शतकात लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा खालील ऐतिहासिक घटना घडल्या :-

१. इसवी सनाच्या "अठराव्या" शतकात, इ.स. १७४० ते इ.स. १८१८ या काळात पेशव्यांचे सरदार "राजे बहाद्दूर नारो शंकर दाणी" यांनी "मालेगाव' येथे किल्ला बांधला. त्यासाठी सुरत व उत्तर भारतातून कारागीर आणले.

२. इ.स.१७४७ साली पेशव्यांचे सरदार "राजे बहाद्दूर नारो शंकर दाणी" यांनी "नाशिक' येथे गोदावरी नदीच्या काठावर "माया" या वास्तुशास्त्राच्या पद्धतीचे शंकराचे मंदिर( नारो शंकर मंदिर) बांधले.(कृपया फोटो पहा)

३. इ.स.१७५० साली "जहांगीर" बादशहाच्या काळात लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या "सुरत" या व्यापारी शहरात एकूण ६५ प्रकारच्या "वाणी" उपजमाती अस्तित्वात होत्या. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होत नसत(संदर्भ:-Hamilton).

४. इ.स.१७६२ साली "रघुनाथराव पेशव्यां" नी पेशव्यांचे सरदार "राजे बहाद्दूर नारो शंकर दाणी' यांची "मुतालिक" म्हणून नियुक्ती केली.

(संदर्भ:- Grant Duffs - Marathas, Vol. I, p. 538)

५. इ.स.१७६७ साली मराठा सरदार "मालजी होळकर" यानी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या "मेवाड" प्रांताची लूट केली.

६. इ.स.१७८० ते इ.स.१८२० या काळात मराठ्यांच्या आक्रमणामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे पूर्वाश्रमीचे वास्तव्य असलेल्या "ओर्छा" चा "सका/शक /Scythian" वंशाच्या, "बुंदेला" घराण्यातील राजा राजस्थानातील "टिकमगड" येथे स्थलांतरित झाला.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page