"अपस्मार व नटराज"
- dileepbw
- Dec 12, 2022
- 9 min read
"अपस्मार व नटराज"
नसलीचे "कोवालम" बीचचे चित्रकोडे ना मला सुटले ना बंड्याला ! जयाला कसे काय जमले ते तिलाच ठाऊक ! नसलीने उत्तर सांगीतल्यावर Surgical Das मधले "Eyes don't see what the mind doesn't know" हे वाक्य आठवले. नसलीने कोवालम बीचवरील मशिदीऐवजी शंकराच्या मंदिराचे चित्र पाठविले असते तर लगेच ओळखले असते.असो.काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचे ? वाचा.
"कोवालम" येथील शंकर हा पिंडीच्या स्वरूपात नसून योद्य्याच्या स्वरूपात आहे.त्याने पायाखाली "अपस्मर" नावाचा बुटका राक्षस तुडविलेला आहे. कोण हा "अपस्मर" ? नसलीच्या Neurology शी तसेच रोमन सम्राट "ज्युलियस सीझर" शी याचा काय संबंध ? वाचा.
ज्ञान-विज्ञानाचे व्यासपीठ असो वा कलाकौशल्याचा रंगमंच; दोन्हीकडे ज्या देवतेच्या 'गुरुत्वा' समोर अभिजन आणि परिजन सारखेच नतमस्तक होतात, ती भारतीय धर्मसंस्कृतीमधील आराध्य देवता म्हणजे "भगवान शिव" होय. समरांगण गाजवणाऱ्या वीरांनी पूजलेला रुद्र भैरव, शास्त्रपरंपरांच्या धुरंधर आचार्यांचाही आदिगुरू दक्षिणामूर्ती सदाशिव किंवा मग कलाकारांचे कुलदैवत "नटराज", ही सर्व एका शिवाचीच नाना रूपे आहेत.
आज आपण पाहणार आहोत या शिवाच्या नटराज रूपाची कहाणी.गायन,वादन,नर्तन अशा त्रिपुटीतून निनादणारं संगीत आणि आंगिक, वाचिक, आहार्य, सात्त्विक अशा चौकडीतून फुलणारा अभिनय यांचे उगमस्थान एकच. ते म्हणजे "नटराज शिव" ! शिवपुराणाच्या "शतरुद्रसंहिते" मध्ये (३४ अध्याय) शिवाच्या 'सुनर्तक-नट' अवताराची कथा येते. हिमालयकन्या पार्वतीच्या कठोर तपामुळे प्रसन्न झालेला वैराग्यमूर्ती महादेव पार्वतीपती होण्यास सज्ज झाला. तत्पूर्वी त्याने बटुरूपात येऊन पार्वतीची परीक्षा पाहिली होती. त्याचप्रमाणे पर्वतराज हिमवान आणि त्याची पत्नी मेना यांचीही परीक्षा घ्यावी व त्यांच्या मनातील आपल्या विषयीच्या साशंकतेचे निरसन करावे या हेतूने शंकराने आपल्या गणांसमवेत 'सुनर्तक' नामक नटाचे रूप धारण केले. पाठीवर कंथा आणि हातांत डमरू, शिंग धारण केलेला, आरक्त वर्णाची वस्त्रे ल्यालेला शिव, हिमवानाच्या राजधानीतील राजप्रासादाच्या प्रांगणामध्ये अवतीर्ण झाला. तेथे परिजनांसोबत बसलेल्या मेना आणि पार्वतीसमोर शिवाने अप्रतिम असे नृत्य-गायन केले. त्यावेळी तेथील उपस्थित सर्वच जण त्या दिव्य कलाविष्कारांमुळे देहभान विसरले. मंत्रमुग्ध झालेल्या स्थितीत मेनाराणीने नटरूपातील शिवाला हवे ते मागून घेण्याची अनुज्ञा दिली. त्या वेळी शंकराने तुमची ही सर्वांगसुंदर कन्या मला लाभावी, अशी इच्छा व्यक्त केली. एका नटनर्तकाने अशी भलतीच केलेली मागणी ऐकून मेनाराणी सावध झाली. तिने नटरूपातल्या शंकराला चांगलेच खडसावले. अनेक रत्नांनी भरलेली सुवर्णपात्रे त्याला देऊ केली. अन्य कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासनही देऊन पाहिले. तरीही तो ऐकत नाही असे पाहून क्रुद्ध झालेल्या मेनाराणीने आपल्या सेवकांना या उद्दंड नटाला हाकलून देण्याची आज्ञा केली. मात्र, कोणत्याही सेवकाला या नटाला साधा स्पर्श करणेही जमेना. इतक्यात गिरिराज हिमालय तेथे आह्निक आटोपून आला. तेव्हा 'नट'रूपी शिवाने त्याच्या समोरही आपल्या इच्छेचा पुनरुच्च्चार केला. तेव्हा हिमालयही रागावला. तो काही करणार याआधीच शंकराने ब्रह्मदेव, विष्णू, सूर्य इ. रूपे दाखवून शेवटी स्वतःचे दिव्य रुद्ररूप प्रकट केले आणि पाहता पाहता तेथेच सर्वरूपांनिशी तो गुप्तही झाला. या अनाहूत प्रसंगामुळे हिमालय-मेना अक्षरशः भांबावून गेले. नंतर स्वतः पार्वतीनेच तो नट म्हणजे साक्षात "शिव" असल्याचे सांगितल्यावर हिमालय-मेनेला आपली चूक उमगली आणि शिवाविषयी त्यांच्या मनात असणाऱ्या शंकांचे समाधानही झाले. तर अशा या नटनर्तकाच्या रूपातील शंकरालाच शिवपुराणात "नटराज" या नावाने संबोधले गेले.नसलीने पाहिलेल्या कोवालम बीचवर याचे प्राचीन मंदीर पहायला मिळते.
नटराजरूपासंबंधी अजून एक कथा "चिदंबर माहात्म्या" मध्ये येते. चिदंबर हे तमिळनाडूमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या स्थानाचा उल्लेख प्राचीन वाङ्मयामध्ये तिल्लई, व्याघ्रपूर, तिरुपादिरिप्पुलियूर अशा वेगवेगळ्या नावांनी केला गेला आहे. पुरातन काळी या क्षेत्रावर वाममार्गी शाक्त सांप्रदायिकांचे वर्चस्व होते. येथे देवीचा उग्र अशा कालीस्वरूपात वास होता. देवीउपासनेच्या नावाखाली अनेक अनैतिक घटना त्या क्षेत्री घडत होत्या. त्यामुळे त्रासून गेलेल्या सात्त्विक भक्तांनी भगवान शंकरालाच साकडे घातले. सज्जनांच्या रक्षणासाठी जेव्हा शंकराचे आगमन तेथे झाले, तेव्हा तेथील वाममार्गी तापसांनी प्रत्यक्ष शिवालाच मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. अघोरी विद्येच्या साह्याने जारणमारणाचे प्रयोग त्या मंडळींनी आरंभले. त्यांनी केलेल्या आभिचारिक हवनातून प्रथम एक अतिशय विषारी सर्प प्रकट झाला. तो सर्प शिवाने लीलया गळ्यात हारासारखा धारण केला. नंतर एक मोठा ढाण्या वाघ त्या हवनकुंडातून बाहेर आला. शिवाने त्या वाघाला मारून त्याचे चर्म कटिवस्त्र म्हणून धारण केले. अखेर त्या तापसांनी आपले सर्व तप पणाला लावून हवनकुंडातून एक "बुटका" काळाकभिन्न पुरुष उत्पन्न केला. पुराणेतिहासामध्ये त्याचाच उल्लेख "मुयलक" अथवा "अपस्मार" या नावांनी केलेला आहे. वामाचरी तापसांचा हा उद्दामपणा पाहून अखेर क्रुद्ध झालेल्या शंकराने तांडव नृत्य करायला सुरुवात केली आणि ते करता करता आपल्या पायाखाली, अज्ञानाचे व दैन्याचे मूर्तिमंत प्रतीक अशा "अपस्मार" पुरुषाला दडपून टाकले.
शंकराचे ते प्रचंड तांडव पाहून सर्व वामाचारी तेथून पळून गेले. मात्र, त्यांची अधिष्ठात्री असणाऱ्या "काली" देवीने शिवाला आव्हान दिले. महाकाल शिव आणि महाकाली यांच्यामध्ये युद्ध झाले तर संपूर्ण ब्रह्मांडाचाच संहार होईल, हे लक्षात घेऊन दोघांनी नृत्याची स्पर्धा लावण्याचे ठरविले. नृत्य स्पर्धेत जो जिंकेल त्याने या क्षेत्री राहावे; हरलेल्याने निघून जावे असा ठराव करण्यात आला. मोठ्या उत्साहाने सर्व देव-देवतांच्या साक्षीने ही शिवशक्तीमधील प्रतियोगिता सुरू झाली. शंकराने भिन्न भिन्न नृत्य मुद्रा कराव्यात आणि कालीने त्या तितक्याच सक्षमपणे सौष्ठवपूर्ण पद्धतीने पुन्हा करून दाखवाव्यात. कधी कालीने नृत्यातील एखादा अवघड तोडा दाखवावा आणि शिवाने एखाद्या प्रतिबिंबासारखा तो वठवावा, असा मोठ्या चुरशीचा सामना तेथे रंगला. अंतिमतः शंकराने केवळ पुरुषालाच करता येतील अशा नृत्यमुद्रा दाखवायला सुरुवात केली, तेव्हा मात्र कालीदेवीला त्या मुद्रा करणे जमेना. अशा प्रकारे शंकराने महाकालीला नृत्यस्पर्धेमध्ये जिंकले. आजही चिदंबरक्षेत्री त्या प्रसंगाची स्मृती म्हणून तांडवमग्न रूपातील शिवमूर्तीची उपासना केली जाते.
तेथील मंदिरे आणि गोपुरांच्या भिंतींवर शिवाच्या वेगवेगळ्या नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत. आनंदतांडव, संध्यातांडव, गौरीतांडव, उमातांडव, कालीतांडव, त्रिपुरतांडव आणि संहारतांडव अशा सात प्रकारच्या तांडवमुद्रांमध्ये नटराजाची मूर्ती दाखवली जाते. यातही "आनंदतांडव" मुद्रेतील नटराजमूर्ती सर्वाधिक प्रचलित आहे.
भगवान विष्णूला शिवाचे नृत्यमग्न ध्यान अतिशय प्रिय आहे. एकदा शेषशय्येवर पहुडले असताना, शिवाचे नटराजरूप आठवून आनंदविभोर झालेल्या नारायणाला शेषनागाने अचानक आनंदित होण्याचे कारण विचारले, तेव्हा नारायणाने शेषाला नटराजस्वरूपाचे माहात्म्य वर्णन केले. ते ऐकून नटराजाचे दर्शन घेण्यासाठी स्वतः शेषनाग पृथ्वीवर महर्षी पतंजलींच्या रूपात अवतरला आणि त्याने चिदंबरक्षेत्री व्याघ्रपाद ऋषींबरोबर तप करून नटराजाचे दिव्य दर्शन व ज्ञान प्राप्त केले, अशीही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
तर अशा नानाविध कथांचा साज आणि बाज लेऊन नटली आहे ही "नटराज" मूर्ती. तिच्याठायी कोणाला संगीत सापडते, तर कोणाला अभिनय; कोणाला होतो चिद्विलासाचा साक्षात्कार, तर कोणाला गवसत जाते अणूपासून पूर्ण ब्रह्मांडापर्यंत अखंड सुरू असणाऱ्या नृत्यसदृश गतीचे गमक!
माझ्यामते "नटराज" हे Scythians व Austreloid या लोकांमधील युध्दाचे "रूपक" आहे. तर हा "अपस्मर" हा राक्षस म्हणजे नसलीच्या शास्त्रातीलव "ज्युलियस सीझर" ला जडलेल्या "Seizors(Epilepsy)" या रोगाचे प्रतिक आहे.कोण आहे हा नसलीच्या Neurology मधला "अपस्मार" ?
Neurology मधे फिट येणं,आकडी,मिरगी आदी नावांनी "अपस्मार" हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत.औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे.
हा आजार प्राचीन काळापासून जगभर आढळून आलेला आहे."अपस्मार" या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. खाली पडल्यामुळे शारीरिक इजा होते. हे धोकादायक असू शकते. मेंदूमध्ये गाठ येणं, ट्युमर्स तयार होणं, जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इजा किंवा जंतू संक्रमण ही अपस्माराची मुख्य कारणं असू शकतात. काही अंशी मेंदूच्या जडणघडणीच्या सुरुवातीच्या काळात झालेली गुंतागुंतदेखील याला कारणीभूत ठरू शकतं. बऱ्याच रुग्णांत अनुवंशिकताही आढळून येते.
"कोवालम बीच" वर असलेल्या नटराज मुर्तीच्या पायाखाली जो बुटका व काळा राक्षस चिरडलेला आढळतो त्याचे नाव आहे "अपस्मर" ! तो "अपस्मार" या रोगाचा तसेच "विस्मृती" चा प्रतिक समजला जातो.त्याची ही पौराणिक कथा https://www.facebook.com/Dr.BhavanaPant/videos/917893068808799/?flite=scwspnss या संकेतस्थळावर अवश्य वाचा.सांगतो ऐका.
जब भगवान शिव शंकर ने "त्रिपुर" नामक असुर का वध किया तो उसके बाद वे खुशी से झूमने लगे। नृत्य की शुरुआतमें उन्होंने अपनी भुजाएं नहीं खोली क्योंकि वे जानते थे कि उससे प्रकृति का संतुलन बिगड़ जायेगा और सृष्टि का विनाश होने लगेगा। लेकिन भगवान शिव कुछ समय पश्चात नृत्यमें इतने मगन हो जाते हैं कि उन्हें किसी तरह कि सुध नहीं रहती और खुल कर नृत्य करने लगते हैं जिसके साथ-साथ सृष्टि भी डगमगाने लगती है। तब उस समय संसार की रक्षा के लिये देवी "पार्वती" भी प्रेम और आनंद में भरकर "लास्य" नृत्य आरंभ करती हैं जिससे सृष्टि में संतुलन होने लगता है व भगवान शिव भी शांत होने लगते हैं। भगवान शिव को सृष्टि के प्रथम नर्तक के रूप में भी जाना जाता है। वहीं ऐतिहासिक रूप से भगवान शिव के "नटराज" स्वरूप के विकास को सातवीं शताब्दी के पल्लव एवं आंठवी से दसवीं शताब्दी के बीच दक्षिण भारत के चोल साम्राज्य से जोड़ा जाता है। वहीं योगसूत्र के जनक महर्षि "पतंजलि" द्वारा बनवाये गये चिदंबरम में स्थित नटराज स्वरूप की भव्य मूर्ति पुख्ता प्रमाण भी मानी जा सकती है। हालांकि महर्षि पंतजलि ने भगवान शिव के नटराज स्वरूप को योगेश्वर शिव के रूप में निरूपित करने का प्रयास किया।
अपने नटराज स्वरूप में भगवान शिव एक बौने राक्षस पर तांडव नृत्य करते हुए लगते हैं। यहां शारीरिक दिव्यांगता को बौनापन नहीं माना बल्कि बौना अज्ञान का प्रतीक है। अज्ञानी व्यक्ति का कद समाज में हमेशा बौना माना जाता है। अज्ञान को दूर कर ज्ञान प्राप्त करने पर जो खुशी मिलती है उन्हीं भावों को शिव के इस स्वरूप में देखा जा सकता है। भगवान शिव की यह नृत्य भंगिमा आनंदम तांडवम के रूप में चर्चित है। इसी मुद्रा में उनके बायें हाथ में अग्नि भी दिखाई देती है जो कि विनाश की प्रकृति है शिव को विनाशक माना जाता है। अपनी इस अग्नि से शिव सृष्टि में मौजूद नकारात्मक सृजन को नष्ट कर ब्रह्मा जी को पुनर्निमाण के लिये आमंत्रित करते हैं। नृत्य की इस मुद्रा में शिव का एक पैर उठा हुआ है जो कि स्वतंत्र रूप से हमें आगे बढ़ने का संकेत करता है। उनकी इस मुद्रा में एक लय एक गति भी नजर आती है जिसका तात्पर्य है परिवर्तन या जीवन में गतिशीलता। शिव का यह आनंदित स्वरूप बहुत व्यापक है। जितना अधिक यह विस्तृत है उतना ही अनुकरणीय भी है।
हम सभी ने भगवान शिव के नटराज रूप को कई बार देखा है। किन्तु क्या आपने ध्यान दिया है कि नटराज की प्रतिमा के पैरों के नीचे एक दानव भी दबा रहता है? आम तौर पर देखने से हमारा ध्यान उस राक्षस की ओर नहीं जाता किन्तु नटराज की मूर्ति के दाहिने पैर के नीचे आपको वो दिख जाएगा। क्या आपको पता है कि वास्तव में वो है कौन? आइये आज इस लेख में हम उस रहस्य्मयी दानव के विषय में जानते हैं।
भगवान नटराज के पैरों के नीचे जो दानव दबा रहता है उसका नाम है "अपस्मार"। उसका एक नाम "मूयालक" भी है। अपस्मार एक बौना दानव है जिसे "अज्ञानता एवं विस्मृति का जनक" बताया गया है। इसे "रोग का प्रतिनिधि" भी माना जाता है। आज भी "मिर्गी" के रोग को संस्कृत में "अपस्मार" ही कहते हैं। योग में "नटराजासन" नामक एक आसन है जिसे नियमित रूप से करने पर निश्चित रूप से मिर्गी के रोग से मुक्ति मिलती है।
एक कथा के अनुसार "अपस्मार" एक बौना राक्षस था जो स्वयं को सर्वशक्तिशाली एवं दूसरों को हीन समझता था। स्कन्द पुराण में उसे "अमर" बताया गया है। उसे वरदान प्राप्त था कि वो अपनी शक्तियों से किसी की भी "चेतना का हरण" कर सकता था। उसे लापरवाही एवं "मिर्गी" के रोग का प्रतिनिधि भी माना गया है। अपनी इसी शक्ति के बल पर अपस्मार सभी को दुःख पहुँचाता रहता था। उसी के प्रभाव के कारण व्यक्ति मिर्गी के रोग से ग्रसित हो जाते थे और बहुत कष्ट भोगते थे। अपनी इस शक्ति एवं अमरता के कारण उसे अभिमान हो गया कि उसे कोई परास्त नहीं कर सकता।
एक बार अनेक ऋषि अपनी-अपनी पत्नियों के साथ हवन एवं साधना कर रहे थे। प्रभु की माया से उन्हें अपने त्याग और सिद्धियों पर अभिमान हो गया और उन्हें लगा कि संसार केवल उन्ही की सिद्धियों पर टिका है। तभी भगवान शंकर और माता पार्वती भिक्षुक के वेश में वहाँ पधारे जिससे सभी स्त्रियाँ उन्हें प्रणाम करने के लिए यज्ञ छोड़ कर उठ गयी। इससे उन ऋषियों को बड़ा क्रोध आया और उन्होंने अपनी सिद्धि से कई विषधर सर्पों को उत्पन्न किया और उन्हें भिक्षुक रुपी महादेव पर आक्रमण करने को कहा किन्तु भगवान शंकर ने सभी सर्पों का दलन कर दिया। तब उन ऋषियों ने वही उपस्थित "अपस्मार" को उनपर आक्रमण करने को कहा। स्कन्द पुराण में ऐसा भी वर्णित है कि उन्ही साधुओं ने अपनी सिद्धियों से ही अपस्मार का सृजन किया। अपस्मार ने दोनों पर आक्रमण किया और अपनी शक्ति से माता पार्वती को भ्रमित कर दिया और उनकी चेतना लुप्त कर दी जिससे माता अचेत हो गयी। ये देख कर भगवान शंकर अत्यंत क्रुद्ध हुए और उन्होंने १४ बार अपने डमरू का नाद किया। उस भीषण नाद को अपस्मार सहन नहीं कर पाया और भूमि पर गिर पड़ा। तत्पश्चात उन्होंने एक आलौकिक "नटराज" का रूप धारण किया और "अपस्मार" को अपने पैरों के नीचे दबा कर नृत्य करने लगे। नटराज रूप में भगवान शंकर ने एक पैर से उसे दबा कर तथा एक पैर उठाकर अपस्मार की सभी शक्तियों का दलन कर दिया और स्वयं संतुलित हो स्थिर हो गए। उनकी यही मुद्रा "अंजलि मुद्रा" कहलाई।
उन्होंने उसका वध इसीलिए नहीं किया क्यूंकि एक तो वो अमर था और दूसरे उसके मरने पर संसारसे "उपेक्षा" का लोप हो जाता जिससे किसी भी विद्या को प्राप्त करना अत्यंत सरल हो जाता। इससे विद्यार्थियों में विद्या को प्राप्त करने के प्रति सम्मान समाप्त हो जाता। जब उन साधुओंने भगवान शंकर का वो रूप देखा तो उनका अभिमान समाप्त हो गया और वे बारम्बार उनकी स्तुति करने लगे। उन्होंने उसी प्रकार अपस्मार को निष्क्रिय रखने की प्रार्थना की ताकि भविष्य में संसार में कोई उसकी शक्तियों के प्रभाव में ना आये। नटराज रूप में महादेव ने जो १४ बार अपने डमरू का नाद किया था उसे ही आधार मान कर महर्षि पाणिनि ने १४ सूत्रों वाले रूद्राष्टाध्यायी "माहेश्वर सूत्र" की रचना की।
एक अन्य कथा के अनुसार एक बार भगवान शंकर के मन में एक आलौकिक नृत्य करने की इच्छा हुई। उसे देखने के लिए सभी देवता, यक्ष, ऋषि, गन्धर्व इत्यादि कैलाश पर एकत्र हुए। स्वयं महाकाली ने उस सभा की अध्यक्षता की। देवी सरस्वती तन्मयता से अपनी वीणा बजाने लगी, भगवान विष्णु मृदंग बजाने लगे, माता लक्ष्मी गायन करने लगी, परमपिता ब्रह्मा हाथ से ताल देने लगे, इंद्र मुरली बजाने लगे एवं अन्य सभी देवताओं ने अनेक वाद्ययंत्रों से लयबद्ध स्वर उत्पन किया। तब महादेव ने "नटराज" का रूप धर कर ऐसा अद्भुत नृत्य किया जैसा आज तक किसी ने नहीं देखा था। उस मनोहारी नृत्य को देख कर सभी अपनी सुध-बुध खो बैठे। जब नृत्य समाप्त हुआ तो सभी ने एक स्वर में महादेव को साधुवाद दिया। महाकाली तो इतनी प्रसन्न हुई कि उन्होंने कहा - "प्रभु! आपके इस नृत्य से मैं इतनी प्रसन्न हूँ कि मुझे आपको वर देने की इच्छा हुई है। अतः आप मुझसे कोई वर मांग लीजिये।" तब महादेव ने कहा - "देवी! जिस प्रकार आप सभी देवगण मेरे इस नृत्य से प्रसन्न हो रहे हैं उसी प्रकार पृथ्वी के सभी प्राणी भी हों, यही मेरी इच्छा है।
तो इस प्रकार "अपस्मार" को अपने पैरों के नीचे दबाये अभय मुद्रा में भगवान शंकर का नटराज स्वरुप ये शिक्षा देता है कि यदि हम चाहें तो अपने किसी भी दोष को स्वयं संतुलित कर उसका दलन कर सकते हैं। महादेव का नटराज स्वरुप पाप के दलन का प्रतीक तो है ही किन्तु उसके साथ-साथ आत्मसंयम एवं इच्छाशक्ति का भी प्रतीक है।
अशा या "अपस्मार" चे वर्णन अन्य संस्कृतींमधे कसे केले आहे ते पहा.
1.Roman emperor Caesar had seizures.
2.Caesar’s son Caesarion had seizures as a child.
3.A number of the emperor’s descendants also had seizure-like symptoms.This might suggest that epilepsy was "inherited' in his family.
4.In medieval France , a heroine named "Joan of Arc" is mentioned to have heard strange voices and seen visions.In scientific terminology, it is called "hallucination" and is caused by diseases of the brain.
5.In ancient Sanskrit literature, the great poet "Magha(माघ)" has compared epilepsy to the ocean. 6.Epilepsy is also mentioned many times in Shakespeare's literature.
6.Russian writer Fedor Mikhailovich Dostoyevsky had partial complex (psychomotor) seizures arising from the temporal lobe.This is called "deja-vu" in French .
7.Famous English poet Lord Tennyson and prose writer Charles Dickenson have also expressed feelings of deja-vu.
8.Dutch world-renowned painter "Vincent Van Gogh" also had epilepsy, despite that he was an artist of the best quality.
Comments