अहिराणीचा अभ्यास
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा
"डॉ.रमेश सीताराम सूर्यवंशी" (कृपया फोटो पहा) यांनी महाराष्ट्रातील "सका/शक/ Scythian" वंशाच्या "लाड सका (शाखीय) वाणी" समाजाच्या "अहिराणी/खानदेशी" भाषेचा सखोल अभ्यास केला असून त्यावरील अनेक पुस्तके पुण्याच्या "अक्षय प्रकाशना" ने प्रकाशित केली आहेत.
"अहिराणी भाषा वैज्ञानिक अभ्यास" या त्यांच्या पुस्तकात "अहिराणी" भाषेचे व्याकरण व वाक्य रचना यांचा उहापोह केलेला आहे. तर "अहिराणी-शब्दकोश" या त्यांच्या पुस्तकात सुमारे १०,००० "अहिराणी" शब्दांची सुसंगत रचना केलेली आढळते.
"अहिराणी-वाकप्रचार व म्हणी " या त्यांच्या पुस्तकात १,००० हून जास्त अहिराणी-वाकप्रचार व ४,००० हून जास्त "अहिराणी-म्हणी" व त्यांचा अर्थ यांचा संग्रह केलेला आहे.
"अहिराणी" शब्दांचा अर्थ अधिक सुलभ व्हावा म्हणून "खानदेशातील कृषक जीवन सचित्र कोश" या नावाचा "शेतकी अवजारांचा सचित्र शब्द संग्रह" देखील त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई तर्फे इ.स. २००२ साली प्रसिद्ध केला आहे.
"अखिल भारतीय खानदेश अकादमी" नावाची स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "अहिराणी/खानदेशी" भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments