आंतरराष्ट्रीय व्यापारापासून वंचित
- dileepbw
- Oct 6, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
मुघलांच्या काळात कित्येक हिंदू व्यापारी वतनदार म्हणून महसुलाचे काम पाहत असत.
मुघलांच्या साम्राज्यामध्ये इसवी सनाच्या १६-१७ व्या शतकात व्यापारी मालाची मुख्य उत्पादक केंद्रे "सिंधू,गंगा व यमुना" नदीच्या तीरावर होती.
मुघलांनी भारताला स्थिर केंद्रीय प्रशासन,राजकीय शांतता,उत्कृष्ट न्याय व्यवस्था,चांगल्या दळण-वळणाच्या व संपर्काच्या सोयी,स्थिर चलन व नाणी (चांदीचा टका व तांब्याचा दिरहाम) ,सुदृढ अर्थ व्यवस्था, असे व्यापाराला पोषक वातावरण दिलेले होते.
त्यामुळे मुघलांच्या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार चांगलाच वाढला होता.
इसवी सनाच्या १७ व्या शतकात "युरोप" खंडा मधून व्यापारी भारतात येऊ लागले.
युरोपमध्ये रेशीम व त्यापासून तयार होणारे तलम कपडे यांना प्रचंड मागणी होती.
त्यामुळे ढाक्का,आग्रा,फतेहपुर शिक्री,लाहोर अशा रेशमी तलम कपडे निर्माण करणाऱ्या शहरांचा व्यापारी उदय झाला.
हिंदू मुलतानी,पंजाबी,भाटीया व मध्य आशियामधून आलेल्या मुसलमान "खुरासनी" व्यापारयानी(कृपया फोटो पहा) त्याचा फायदा उचलला.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची "देव" मंडळी त्यावेळी "दक्षिणपथ" पकडून गंगा-यमुना खोऱ्याकडे न जाता "सिंधू-नर्मदा-तापी-गिरणा या नद्यांची दिशा पकडून काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा मार्ग धरून शेवटी जळगाव-चाळीसगाव-पिलखोड अशा ठिकाणी स्थायिक झाली.
त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची "देव" मंडळी "आंतरराष्ट्रीय व्यापारा" पासून तेंव्हाही वंचित राहिली व धनवान होऊ शकली नाहीत. .
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments