आपले "Denisovans" पूर्वज
- dileepbw
- Sep 20, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल.
त्या मधे हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.
याला पुष्टी देणारे जनुकशास्त्रीय संशोधन नुकतेच विविध वैज्ञानिक नियतकालिंकामधून प्रसिध्द झाले आहे. त्या संबंधीची माहिती या अभ्यासगटात थोडक्यात प्रसृत केली आहे. ती समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी अवश्य वाचावी व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज
भारतीय इतिहास ज्या भाषेत लिहिलेला आहे त्या "संस्कृत" भाषेत
"शक" या नावाने ओळखले जात असत.तर ग्रीक इतिहासात त्यांना "Scythians" व जुन्या पारशी इतिहासात "Sakā" म्हणून ओळखले जाते. तर नवीन पारशी भाषेत "Sakā" लोकांचा उल्लेख "पश्तो/Pashto" असा केला जातो. आपल्या धनुर्विद्येतील कौशल्यामुळे ते मध्य आशियात "Scyth, Saka, Sakae, Sai, Iskuzai, Askuzai" अशा विविध नावांनी ओळखले जात असत.या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच - "धनुर्धर" !
इ.स.२०१८ पासून जगभरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या आधुनिक जनुकीय संशोधनातून या प्राचिन इतिहासाला पुष्टी मिळत आहे.
ही सर्व माहिती वाचताना Bill Sullivan यांचे Nat Geo या संशोधनपत्रात प्रसिध्द झालेले खालील वाक्य ही लक्षात घेण्यासारखे आहे : -
"Genes are the piano keys but the environment plays the song“
त्यामुळे वातावरणात असे काय बदल होत गेले की मध्य आशियातील "Denisovans" या आदीमानवापासून "सका/शक/Scythian" वंशाचे मानव व त्यांच्यापासून लाड सका (शाखीय) वाणी लोक निर्माण होत गेले,याचा अभ्यास व्हायला हवा.
या प्रश्नाची उत्तरे लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुल, कुलग्राम,कुलनाम यांच्या अभ्यासात दडलेली आहेत.त्यासाठी या समाजाच्या धार्मिक संकल्पना, सामाजिक चालीरिती,कुलाचार या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments