top of page

आपला ग्रीक इतिहास

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणारे,इराणी मूळ असलेले "सका/शक/Scythian" वशांचे पूर्वज इतिहासात "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जातात. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - ग्रीक इतिहासकार Herodotus)

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "Kindred Scythians/Eastern Scythians" या नावाने ओळखल्या जाणार्‍या या पूर्वजांचा उल्लेख चीनच्या प्राचीन इतिहासात तराई खोर्‍यात,पामीर पर्वता जवळ वास्तव्याला असलेले इराणी मूळाचे "साॅगडियन्स व खोतानीज् (Sogdians and Khotanese)" असा केलेला आढळतो.त्यांची संस्कृती "झमन बाबा(Zaman-Baba culture)" या नावाने ओळखली जात असे. ते मध्य आशियात अल्फाअल्फा ही वनस्पती,द्राक्षे,बकर्‍या,मेंढ्या, घोडे,वाद्ये यांचा व्यापार करीत असत.इराणमधील भूमीगत जलनिसा:रण पध्दत चीनमधे आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.या "साॅगडियन्स व खोतानीज् (Sogdians and Khotanese)" व्यापार्‍यांनी बौध्द,मझदा,मनिच,ख्रिस्ती व मुस्लिम (Bud­dhism, Mazdaism, Manicheism,Islam) धर्माचा प्रसार चीनमधे केला.जेथे आर्थिक फायदा असेल तेथे हे व्यापारी लगेच पोहोचत असत.त्यामुळे त्यांनी चीनमधील रेशीम मार्गावर ठिकठिकाणी आपली व्यापारी केंद्रे उभी केली होती.इ.स.च्या चवथ्या शतकात "कंग" या आडनावाचे अनेक "साॅगडियन्स व खोतानीज्" व्यापारी समरकंद येथे वास्तव्याला होते.त्यांची भाषा हीच व्यापाराची सर्वमान्य भाषा मानली जात असे(Pulleyblank, 1952, p. 317). इ.स.च्या सातव्या शतकानंतर मात्र तेथे इराणी भाषा रूढ झाली(Pelliot, 1912, p. 105).

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता, कुलाचार,कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page