आपला पूर्वज राजा नहपान
- dileepbw
- Sep 17, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाअधिवेशनच्या निमित्ताने प्रसृत करण्यात आलेली राजस्थान,गुजरात ते महाराष्ट्र या स्थलांतराची ध्वनीचित्रफीत पहाण्यात आली.त्यामुळे या स्थलांतराचा धांडोळा घेताना हाती लागलेली काही माहिती सर्वांच्या माहितीसाठी प्रसृत करीत आहे.
जे लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव नाशिक शहरात वास्तव्याला आहेत त्यांनी पांडव लेण्यातील दहा नंबरच्या "नहपान गुंफा" या गुंफेच्या प्रवेशद्वारावरील आपला पूर्वज "उषवदत्त" याचा शीलालेख अवश्य पहावा.इ.स.पू.१२० साली कोरलेल्या या शीलालेखात आपला पूर्वज "राजा नहपान" याने केलेल्या दानधर्माचा उल्लेख केलेला आहे.हा संस्कृत भाषेत लिहिलेला दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन शीलालेख समजला जातो.त्या आधी आपले पूर्वज प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीचा वापर करीत असत.
आपले मथुरेचे "सका/शक/Scythian" पूर्वज मात्र भारतीयांशी झालेली एकरूपता दर्शविण्यासाठी संस्कृत भाषेचा वापर करीत असत.आपला पूर्वज राजा "पहिला रूद्रदमन" याचा असाच एक संस्कृत भाषेतील इ.स.१५० सालातील शीलालेख जुनागड येथे सापडला आहे.
आपला पूर्वज "राजा नहपान" याचा जावई "उषवदत्त" याने ही "नहपान गुंफा" बौध्द भिक्षुकांसाठी निर्माण केली.त्यासाठी त्याने ३००० सुवर्णमुद्रांचे दान केले.Richard Salomon या अभ्यासकाच्यामते "उषवदत्त" याने उत्तर भारतीतील मथुरेच्या "सका/शक/Scythian" राजांची संस्कृत भाषेचा वापर करण्याची प्रथा दक्षिण भारतात सुरू केली.
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.विजय विखराणकर, मुंबई यांनी आपल्या या पूर्वज राजांच्या नाण्यांचा संग्रह केला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.सर्वांनी तो अवश्य पहावा.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)




Comments