top of page

आपली सांस्कृतिक राजधानी धुळे

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 1 min read

"लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी "धुळे" व भारतरत्न सर विश्‍वेश्‍वरय्या यांचा अतूट संबंध"

भारतरत्न सर विश्‍वेश्‍वरय्या यांनी धुळे शहराची पिण्याच्या पाण्याची योजना तयार केली आहे.

एक ही युनिट विजेचा खर्च न करता केवळ ग्रॅव्हिटीने डेडरगाव तलावाचे पाणी धुळे शहरात मालेगाव रोड वरील दगडी टाकीपर्यंत आणण्याची एकमेव अशी सायफन व ग्रॅव्हिटीची पाणी पुरवठा योजना त्यांनी बनविली आहे.

सर विश्‍वेश्‍वरय्या ऑक्टोबर इ.स. १८८५ मध्ये धुळ्यास सहाय्यक अभियंता वर्ग १ म्हणून बदलीवर आले.१६ महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी काही काळ कार्यकारी अभियंत्यांचाही कार्यभार सांभाळला. या काळात त्यांनी साक्री तालुक्यात दातर्तीला पांझरा नदीच्या खालून ३०० फूट लांबीचा सायफन पद्धतीचा कालवा १३० वर्षापूर्वी बांधला.तो आजही कार्यरत आहे.

संपूर्ण जगात नावाजलेली ही पांझरेवरची फड सिंचन पद्धत ही डॉ. सर विश्‍वेश्‍वरय्या यांचीच देणगी !

या योजनेत कमांड एरियातील सर्व शेतकर्‍यांना समान पाणी मिळण्याची अत्यंत व्यवहार्य पद्धत त्यांनी त्याकाळी आखून दिली होती.

धुळ्यातील निवृत्त अभियंता श्री. हिरालालजी ओसवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्या या अतुलनीय कामगिरीची स्मृती म्हणून धुळ्यात जुन्या सिव्हील हाॅस्पीटल समोर बांधकाम खात्याच्याच आवारात एक चांगले संग्रहालय निर्माण केले आहे.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९५३४, गट २ - ४७४८, गट ३ - ५०११, गट ४ - ४४१५, गट ५ - ३३७९, गट ६ - ३५७८,गट ७ - ३३४९)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page