top of page

"आलापाचे शास्त्र - जीवन मे पिया तेरा साथ रहे"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 3 min read

"आलापाचे शास्त्र - जीवन मे पिया तेरा साथ रहे"

©दिलीप वाणी,पुणे

उदयचे कालचे "अनाक्षर/आ-कारयुक्त" आलापावरून गीत ओळखण्याचे कोडे मला तरी अजिबात सुटले नाही.त्यामुळे आज "आलापाचे शास्त्र" समजावून घेतले.ते जरूर वाचा.म्हणजे सर्वांनाच अशा प्रकारची कोडी सुटत जातील.

टोपीला जवळ जवळ सर्वच गाणी अचूकपणे ओळखता आली.हे कसे जमले ? याचे मला कुतूहूल आहे. हे Cardiac Murmur ओळखण्यासारखेच आहे का ? का ECG वाचण्यासारखे आहे ? या आलापांचा देखील ECG सारखा "आलेख" काढला तर ही गाणी डोळ्यांनी देखील पहाता येऊ शकतील का ? अशा अनेक शंका माझ्या मनात येऊन गेल्या. त्यावर उदयचे म्हणणे असे आहे की वरील गाणी तुमच्या परिचयाची असतील,तुम्ही ती वारंवार ऐकली असतील तरच त्याचे उत्तर देता येते.

उदयचे हे उत्तर मला काही फारसे पटलेले नाही.हे उत्तर म्हणजे रोज ECG काढणार्‍या तंत्रज्ञाने हा ECG नेहेमीसारखा नाही.काही तरी वेडेवाकडे आहे.ह्रदयात काही तरी गडबड वाटते आहे असे सांगण्यासारखे आहे.मी काय म्हणतो आहे ते टोपीला बरोबर कळेल.कारण Radiology तंत्रज्ञ पण हेच उद्योग करीत असतात.

त्यामुळे तंत्रज्ञासारखा नुसता "आलाप" ओळखण्यापेक्षा या आलापांचा "संगीत वैज्ञानिक परिचय" करून घ्यायचे मी ठरविले आहे.त्यासाठी उदय म्हणतो तसे मला पाच पंचवीस लेख तरी लिहावेच लागतील.त्यासाठी आधी वाचतो व मग क्रमाने सांगतो.जरूर वाचा.

चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे "आरोहावरोही गुच्छ" बांधतो, त्याला "आलाप" असे म्हणतात.ख्यालगायनात आलापाला तालाची अथवा गीतशब्दांची आवश्यकता असतेच असे नाही.गीतशब्द ज्यात नाहीत ते "आ-कारयुक्त आलाप", ज्यात आहेत ते "बोल-आलाप" !

अनेक गायक ‘अनंत हरि नारायण’  या शब्दाधाराने आलाप करतात.तालरहित आलापांना ‘नायकी’ आणि सताल आलापांना ‘गायकी’ म्हणतात. धृपदाच्या आलापीला ‘नोमतोम’ ही म्हणतात.या आलापीत ठेका वाजवीत नाहीत,तथापि तीत एक स्थूल लय मात्र गोविलेली असते.

उदयच्या कोड्यातील सर्व "अनाक्षर/आ-कारयुक्त आलापां" चे संगीतशास्त्र समजून घेतले की मग एक एक "आलाप" तुम्हाला समजावून सांगतो.

उदयच्या "अनाक्षर/आ-कारयुक्त" आलापावरून गीत ओळखण्याच्या कोड्यातील "राग गारा व ताल केहरवा" मधला तिसरा आलाप आहे रफी व लताच्या आवाजातील,भरत व्यास रचित व वसंत देसाई यांनी स्वरबध्द केलेल्या "गूंज उठी शहनाई" या चित्रपटातील राजेंद्रकुमारवर चित्रित झालेल्या "जीवन मे पिया तेरा साथ रहे" या गीताच्या सुरूवातीचा ! ऐका !

रोक सके ना राह हमारी, दुनियाँ की दीवार

आ आ आ आ आ

साथ जियेंगे, साथ मरेंगे, अमर हमारा प्यार

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ

आ आ आ आ आ आ आ आ आ आ

आ आ आ आ आ आ आ आ आ आ

आ आ आ आ आ आ आ आ आ आ

जीवन मे पिया तेरा साथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे

हाथों मे तेरे मेरा हाथ रहे

हाथों मे तेरे मेरा हाथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे

आ आ आ आ आ

ओ ओ ओ ओ ओ

शिंगार भरा पिया प्यार तेरा

शिंगार भरा पिया प्यार तेरा

झनकार करे हो मेरे कंगना मे

झनकार करे हो मेरे कंगना मे

लगी जबसे लगन मेरे मन मे सजन

लगी जबसे लगन मेरे मन मे सजन

शहनाई बजे हो मेरे अंगना में

शहनाई बजे हो मेरे अंगना में

सरगम की सदा

हो, जी हो-हो-हो

सरगम की सदा बरसात रहे

सरगम की सदा बरसात रहे

हाथों मे तेरे मेरा हाथ रहे

हाथों मे तेरे मेरा हाथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे

जब तक सूरज, चंदा चमके

गंगा, जमुना मे बहे पानी

जब तक सूरज, चंदा चमके

गंगा, जमुना मे बहे पानी

रहे तब तक प्रीत अमर अपनी

रहे तब तक प्रीत अमर अपनी

है ये जनम-जनम की दीवानी

है ये जनम-जनम की दीवानी

हो, रानी याद मिलन

हो, जी हो-हो-हो

रानी याद मिलन की ये रात रहे

पिया याद मिलन की ये रात रहे

हाथों मे तेरे मेरा हाथ रहे

हाथों मे तेरे मेरा हाथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे

जीवन मे पिया तेरा साथ रहे (आ आ आ)

काही बोध झाला का या "अनाक्षर/आ-कारयुक्त" आलापावरून ? टोपी सारखा ज्याला "संगीताचा उपजत कान" आहे त्यालाच हे ऐकू येते.तर आपल्यासारख्यांना ते लिहिलेले समजते.मराठी शब्दकोशामध्ये "आलाप" याचा अर्थ गाण्यांतील, संगीतांतील स्वर,तान,लकेर; रागाचा आकार, आवाजी जमवणें;गाण्याची तयारी करणें असा दिलेला आहे.आलाप काढणें म्हणजे गाण्याला सुरवात करण्यापूर्वीं स्वर जमविणे.एखादी व्यक्ती जशी तिच्या "चाली" वरून ओळखू येते(उदा.कपटी शकुनची लंगडी चाल,अहंकारी दुर्योधनाची छाती ताणलेली चाल) तसेच हे आलाप आपल्या "चाली" वरून ओळखू येतात.हे आलाप एखाद्या "पुष्पगुच्छा" सारखे आहेत.यातले एक एक फूल म्हणजे एक स्वर ! ते कसे गुंफले आहेत "राग गारा" या पुष्पगुच्छात ? जरूर वाचा.

राग गारा

थाट - खमाज/काफी

प्रकार - सम्पूर्ण - सम्पूर्ण 

अपना समय - शाम ६ बजे / ९ बजे - देर शाम

अरोह - नाएसजी (कोमल) एम पीडीएनएस

अवरोह - नाएसएनडीपी एम जी (कोमल) एस पकड़ - आर जी आरएसडी एन पीडीएनएसजीएमआर जी आर

चालान - आर जी आरएसडी एन पीडीएनएसजीएमआर जी आर

वादी - गा

सामवादी - नी

समान राग - पीलू जयजयवंती

या सगळ्यांचा मिळून तयार होतो तो "राग गारा" ! त्याची पुन्हा पुन्हा उजळणी म्हणजे "रियाज" केला की रहाते लक्षात !


Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page