"आलापाचे शास्त्र - भिगा भिगा प्यार का समा"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 3 min read
"आलापाचे शास्त्र - भिगा भिगा प्यार का समा"
©दिलीप वाणी,पुणे
उदयचे कालचे "अनाक्षर/आ-कारयुक्त" आलापावरून गीत ओळखण्याचे कोडे मला अजिबात सुटले नाही.त्यामुळे आज "आलापाचे शास्त्र" समजावून घेतले.ते जरूर वाचा.म्हणजे सर्वांनाच अशा प्रकारची कोडी सुटत जातील.
टोपीला जवळ जवळ सर्वच गाणी अचूकपणे ओळखता आली.हे कसे जमले ? याचे मला कुतूहूल आहे. हे Cardiac Murmur ओळखण्यासारखेच आहे का ? का ECG वाचण्यासारखे आहे ? या आलापांचा देखील ECG सारखा "आलेख" काढला तर ही गाणी डोळ्यांनी देखील पहाता येऊ शकतील का ? अशा अनेक शंका माझ्या मनात येऊन गेल्या. त्यावर उदयचे म्हणणे असे आहे की वरील गाणी तुमच्या परिचयाची असतील,तुम्ही ती वारंवार ऐकली असतील तरच त्याचे उत्तर देता येते.
उदयचे हे उत्तर मला काही फारसे पटलेले नाही.हे उत्तर म्हणजे रोज ECG काढणार्या तंत्रज्ञाने हा ECG नेहेमीसारखा नाही.काही तरी वेडेवाकडे आहे.ह्रदयात काही तरी गडबड वाटते आहे असे सांगण्यासारखे आहे.मी काय म्हणतो आहे ते टोपीला बरोबर कळेल.कारण Radiology तंत्रज्ञ पण हेच उद्योग करीत असतात.
त्यामुळे तंत्रज्ञासारखा नुसता "आलाप" ओळखण्यापेक्षा या आलापांचा "संगीत वैज्ञानिक परिचय" करून घ्यायचे मी ठरविले आहे.त्यासाठी उदय म्हणतो तसे मला पाच पंचवीस लेख तरी लिहावेच लागतील.त्यासाठी आधी वाचतो व मग क्रमाने सांगतो.जरूर वाचा.
चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे "आरोहावरोही गुच्छ" बांधतो, त्याला "आलाप" असे म्हणतात.ख्यालगायनात आलापाला तालाची अथवा गीतशब्दांची आवश्यकता असतेच असे नाही.गीतशब्द ज्यात नाहीत ते "आ-कारयुक्त आलाप", ज्यात आहेत ते "बोल-आलाप" !
अनेक गायक ‘अनंत हरि नारायण’ या शब्दाधाराने आलाप करतात.तालरहित आलापांना ‘नायकी’ आणि सताल आलापांना ‘गायकी’ म्हणतात. धृपदाच्या आलापीला ‘नोमतोम’ ही म्हणतात.या आलापीत ठेका वाजवीत नाहीत,तथापि तीत एक स्थूल लय मात्र गोविलेली असते.
उदयच्या कोड्यातील सर्व "अनाक्षर/आ-कारयुक्त आलापां" चे संगीतशास्त्र समजून घेतले की मग एक एक "आलाप" तुम्हाला समजावून सांगतो.
उदयच्या "अनाक्षर/आ-कारयुक्त" आलापावरून गीत ओळखण्याच्या कोड्यातील रफी व शमशाद बेगमच्या आवाजातला सहावा आलाप आहे प्रेम धवन रचित व हंसराज बहल यांनी "राग शिवरंजनी" मधे स्वरबध्द केलेल्या "सावन" या चित्रपटातील "भीगा भीगा प्यार का समा" या गीताच्या सुरूवातीचा ! ऐका !
भीगा भीगा प्यार का सामान
बता दे तुझे जाना है कहाँ बलिए
बता दे तुझे जाना है कहाँ
चलूँगी तू ले चले जहां
की तेरे बिना जाना है कहाँ
बलिया की तेरे बिना जाना है कहाँ
भीगा भीगा प्यार का सामान
बता दे तुझे जाना है कहाँ बलिए
बता दे तुझे जाना है कहाँ
सोच समझ ले बड़ी मुश्किल है
प्यार की राहों में
प्यार की राहों में
मुझे डर कैसा मेरी दुनिया है
पीया तेरी बांहों में
पीया तेरी बांहों में
सोच समझ ले बड़ी मुश्किल है
प्यार की राहों में
प्यार की राहों में
मुझे डर कैसा मेरी दुनिया है
पीया तेरी बांहों में
तुम सैग जोड़ी प्रीत की डोरी
मैं तो हुई तेरी सजना
की तेरे बिना जाना है कहाँ
भीगा भीगा प्यार का सामान
बता दे तुझे जाना है कहाँ बलिए
बता दे तुझे जाना है कहाँ
मुड़ के न देखे कभी दिलवाले
छोड़ी हुई मज़िल को
छोड़ी हुई मज़िल को
चल ही दिए तो रुकना कैसा
अब जो हो सो हो
मुड़ के न देखे कभी दिलवाले
छोड़ी हुई मज़िल को
छोड़ी हुई मज़िल को
चल ही दिए तो रुकना कैसा
अब जो हो सो हो
तू है मेरी काया मैं हूँ तेरी छाया
जहां तू है मैं भी हूँ वहाँ
की तेरे बिना जाना है कहाँ
बलिया की तेरे बिना जाना है कहाँ
भीगा भीगा प्यार का सामान
बता दे तुझे जाना है कहाँ बलिए
बता दे तुझे जाना है कहाँ
चलूँगी तू ले चले जहां
की तेरे बिना जाना है कहाँ
बलिया की तेरे बिना जाना है कहाँ.
काही बोध झाला या "अनाक्षर/आ-कारयुक्त" आलापावरून ? टोपी सारखा ज्याला "संगीताचा उपजत कान" आहे त्यालाच हे ऐकू येते.तर आपल्यासारख्यांना ते लिहिलेले समजते.मराठी शब्दकोशामध्ये "आलाप" याचा अर्थ गाण्यांतील, संगीतांतील स्वर,तान,लकेर; रागाचा आकार, आवाजी जमवणें;गाण्याची तयारी करणें असा दिलेला आहे.आलाप काढणें म्हणजे गाण्याला सुरवात करण्यापूर्वीं स्वर जमविणे.एखादी व्यक्ती जशी तिच्या "चाली" वरून ओळखू येते(उदा.कपटी शकुनची लंगडी चाल,अहंकारी दुर्योधनाची छाती ताणलेली चाल) तसेच हे आलाप आपल्या "चाली" वरून ओळखू येतात.हे आलाप एखाद्या "पुष्पगुच्छा" सारखे आहेत.यातले एक एक फूल म्हणजे एक स्वर ! ते कसे गुंफले आहेत "राग शिवरंजनी" या पुष्पगुच्छात ? जरूर वाचा.
थाट – काफी
स्वर – कोमल ग॒ स्वर
वर्जित स्वर – मध्यम व निषाद
वादी – प
संवादी – सा
समय – मध्य रात्रि
जाति – औड़व – औड़व
विशेषता – वियोग श्रृंगार रस।
आरोह : सा रे ग॒ प, ध सां
अवरोह : सां ध प, ग॒ रे सा।
पकड़ : ध प ग॒ रे, ध़ रे सा।
या सगळ्यांचा मिळून तयार होतो तो "राग शिवरंजनी" ! त्याची पुन्हा पुन्हा उजळणी म्हणजे "रियाज" केला की रहाते लक्षात !




Comments