top of page

"एकविरा माताजी,देवपूर,धुळे"

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

"एकविरा माताजी,देवपूर,धुळे"

आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या "एकविरा माताजी,देवपूर,धुळे" या संकेतस्थळावर(www.aadishaktishriekvira.com)श्री एकवीरादेवीची माहिती,धुळे शहराचा इतिहास,एकवीरादेवी मंदिरात होणारे नैमित्तिक व उत्सव कार्यक्रम,देवीचे छायाचित्र आदींसह आरती संग्रह देण्यात आला आहे.

या संकेतस्थळावरील उपयुक्त माहिती भाविकांसाठी(लाड सका वाणी समाजामधील "देव" कुल) देत आहे :-

सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या "पांझरा" नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे.

धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्‍या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश,राजस्‍थान,कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्याने येथे सतत वर्दळ असते.

भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी,नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे.

आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या "परशूराम" या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जाते.

एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्‍याची धारणा आहे.

"जमदग्‍नी" ऋषींची पत्‍नी असलेल्‍या "रेणुका" मातेचा (रेणूक राजाची पुत्री ) परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्‍याने या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्‍हणून रूढ झाले.

कर्नाटक राज्‍यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

प्रभातकाळी पांझरेच्‍या पात्रातून उगवणा-या सुर्याची कोवळी किरणे जेव्‍हा पूर्वाभिमुखी असलेल्‍या या देवीच्‍या पायी लोटांगण घेतात तेव्‍हा हे दृश्‍य डोळयात साठवून घेण्‍यासारखे असते.

यावेळी गाभा-यात सतत तेवत असलेल्‍या नंदादीपाच्‍या स्निग्‍ध प्रकाशातही पद्मासनी बसलेल्‍या या आदिमायेचे अष्‍टभूजा रूप अधिकच उजळून दिसते.

देवीच्‍या उजव्‍या बाजूस श्री गणपती व डाव्‍या बाजूस तुकाईमातेची चतुर्भूज शेंदूर लेपित मूर्ती आहे.

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page