किराणा मालाचा किरकोळ व्यापार
- dileepbw
- Oct 6, 2022
- 1 min read
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे एकोणिसावे शतक"
इसवी सनाच्या "एकोणिसाव्या" शतकात, इ.स.१८६४ साली ब्रिटीश लोकांनी "मुंबई-अहमदाबाद" रेल्वे सुरु केली(कृपया इ.स.१८६४ सालचा बडोदा स्टेशनचा फोटो पहा). त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचे "अहमदाबाद" हे व्यापारी शहर एक "अंतरराष्ट्रीय व्यापारी शहर" तसेच "अंतरराष्ट्रीय कापड उत्पादक केंद्र" म्हणून उदयाला आले.
"प्रागतिक" व्यापाऱ्यांनी विशेषतः पारशी,बोहरा,मारवाडी,पंजाबी,भाटीया इ. मंडळीनी ब्रिटीशांच्या नव्या व आधुनिक दळणवळण(रेल्वे) व संपर्क (टेलिग्राफ) सेवांचा लाभ घेऊन आपला व्यापार वृद्धिंगत केला."अहमदाबाद" येथील "प्रागतिक व्यापाऱ्यां" नी ब्रिटिशानी पुरवलेल्या सुरक्षिततेचा, जकातकरावरील सवलतींचा व खासगी मालमत्ता निर्माण करण्यास पोषक असलेल्या कायद्यांचा पुरेपूर फायदा उठवला. "घरगुती हातमाग" काही प्रमाणात चालू राहिले पण ज्यांनी "आधुनिक तंत्रज्ञाना" ची कास धरली व पारशी लोकांनी शोधून काढलेले यांत्रिक माग बसविले त्यांचे कापड पार साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचले.
"जुन्या पठडीत" ला लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील व्यापारी मात्र परंपरागत पद्धतीने "किरकोळ किराणा मालाच्या व्यापारा" मध्ये व "वाढीदिढी/मनुतीच्या किरकोळ सावकारी" मध्येच गुंतून राहिला. त्यावेळी "आधुनिक तंत्रज्ञाना" ची कास धरली असती तर आज लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज देखील कुठल्या कुठे जाऊन पोहोचला असता.
ब्रिटिशाना भारतामधील तत्कालीन समाज व्यवस्था बदलण्यात काडीचाही रस नव्हता. त्यांना "उत्कृष्ट प्रशासन" व "प्रभावी लष्करी ताकत" उभी करायची होती. त्यामुळे "किरकोळ सावकारी" व "किरकोळ शेती" करणाऱ्या समाजांना त्यांनी आधुनिकतेची व यांत्रिकीकरणाची जोड देऊन ब्रिटीश व्यापारामध्ये सामाऊन घेण्याची संधी दिली. ज्या भारतीय व्यापारी समाजांनी ही संधी घेतली त्यांनी व्यापाराचे "सोने" केलेले आज आपण पाहतो.
पण ज्यांनी ही संधी घेतली नाही त्यांना आज व्यापारातून बाहेर पडून उपजीविकेचे अन्य मार्ग शोधावे लागल्याचे दिसते आहे. आपण सारे सुज्ञ आहात. त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज कोठे मोडतो हे ज्याने त्याने ठरवावे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments