"कुलदेवतां" ची बदलत गेलेली मूळ(आद्य)रूपे"
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "कुलदेवतां" ची बदलत गेलेली मूळ(आद्य) स्वरूपे"
"वर्ण आणि जाती" यावर आधारलेल्या तत्कालीन भारतीय समाज व्यवस्थेत लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाने या व्यवस्थेतील आपले स्थान कसे उंचावता येईल याचा देखील प्रयत्न येथील रिती-रिवाज स्वीकारताना केलेला आढळून येतो.
मध्य आशियातून भारतात आलेले लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "सका" पूर्वज व भारतातील स्थानिक समाज यांच्या सतत संपर्कातून एकमेकांनी एकमेकांच्या देवता स्वीकारल्या आढळतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप देखील बदलत गेलेले आढळते.
एखाद्या देवतेचा "कुलदेवता" म्हणून स्वीकार केला जातो त्याच्या मुळाशी कोणत्या प्रेरणा असतात ?
अर्थात दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी जी देवता फलप्रद होऊ शकेल अशी देवता निवडली जाते.
शेतकऱ्याला शेतातून भरपूर पीक देण्यास मदत करणारी, विणकराला कापड विणण्यात,सुताराला व चर्मकाराला त्यांच्या त्यांच्या व्यवसायात साह्यभूत होणाऱ्या देवताना अग्रपूजेचा मान मिळतो. त्या त्यांच्या उपास्य देवता होतात आणि त्यांनाच कुलदेवतेचे स्थान प्राप्त होते.
या तत्वालाच अनुसरून दुकानदारी, व्यापार व सावकारी हे व्यवसाय करणाऱ्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "लक्ष्मी" हे आराध्य दैवत बनलेले आहे.




Comments