कल्याणकारी प्रतिष्ठान
- dileepbw
- Sep 13, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज हा रूढीप्रिय समाज ! या समाजातील श्रध्दा,प्रथा व रितीरिवाजांना आता नवे परिमाण प्राप्त होऊ लागले आहे.हे पाहून आनंद वाटतो.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावांनुसार "श्राध्द" साध्या पद्धतीने करून वाचलेली रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याची संकल्पना लाड सका (शाखीय) वाणी समाजामधे चांगलीच रूजू लागली आहे.
या ठरावाला अनुरूप असा निर्णय घेऊन सौ.ताराबाई प्रकाश मालपुरे, वाघळी यांनी आपल्या मातोश्री कै.सौ.सिंधुबाई गरबड अमृतकार तर त्यांचे पती श्री.प्रकाश पंढरीनाथ मालपुरे, नासिक यांनी आपले तीर्थरूप कै.श्री.गरबड सोनु अमृतकार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "कल्याणकारी प्रतिष्ठान" या संस्थेला रुपये ५१००/- ची देणगी दिली आहे.
या निमित्ताने "कल्याणकारी प्रतिष्ठान" या संस्थेच्या कार्याची माहिती करून घेणे उचित ठरेल.
"कल्याणकारी प्रतिष्ठान" या संस्थेची उभारणी विश्वस्तांनी स्वत:चे पैसे जमा करुन व त्याची ठेव(FD) करून झाली. या ठेवीच्या वार्षिक व्याजातून दरवर्षी साधारण ४ ते ४.५० लाख रुपयांची आर्थिक शिष्यवृत्ती गरजू व हुषार विद्यार्थ्यांना,फक्त उच्च शिक्षणासाठी, बिनव्याजी कर्जावू स्वरुपात म्हणून गेल्या आठ वर्षापासून प्रदान करण्यात आली.काळाच्या ओघात शिष्यवृत्तीचे मागणी अर्ज वाढत गेले व ही मागणी पुरविण्यासाठी ठेवींवरील व्याज अपुरे पडू लागले. गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू लागले.याची जाणीव समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना झाली.अनेकांनी आपल्या जीवलगांचे श्राध्द साध्या पद्धतीने करून वाचलेली रक्कम या चांगल्या कामासाठी दान करण्याचा निर्णय घेतला.
या वर्षी ५५ विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत.या अर्जांची पडताळणी करून पैशांच्या उपलब्धतेनुसार दिनांक १८ आॅगस्ट,२०१९ रोजी "माहेरघर" येथे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करता यावी यासाठी लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी या योजनेत मोठ्या संख्येने आपला आर्थिक सहभाग नोंदणे आवश्यक आहे.
आता पर्यंतच्या समाज जागृतीमुळे या वर्षी मागील वर्षापे़क्षा साधारण ५ ते ७ अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देता येणार आहे.याचे न मोजता येणारे एक वेगळेच समाधान मिळणार आहे.गरीब कुटूंबातील एक विद्यार्थी उच्च शिक्षीत झाला तर ते कुटूंब खर्या अर्थाने कायम स्वरुपी आर्थिक सक्षम होत असते.या विचाराने वाटचाल करणार्या कल्याणकारी प्रतिष्ठान संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या सर्व समाज बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन !
अशाच प्रकारे विवाह सोहळा देखील साध्या पद्धतीने साजरा करून वाचलेली रक्कम ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरांमधे वसतीगृहे उभारून सोय निर्माण केल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाजाची शैक्षणिक प्रगती होण्यास वेळ लागणार नाही.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments