गुढी पाडवा
- dileepbw
- Sep 20, 2022
- 2 min read
नवविचाराची पहाट झाली,
प्रबोधनाची कास धरू
मिटवू सार्या जाती पाती
हिंदू सारा एक करू
सर्वांना "हिंदू नववर्षा" च्या हार्दिक शुभेच्छा !
"मी समाजाचा समाज माझा" असा नारा देऊन लाड सका (शाखीय) वाणी समाजातील अनेक संस्था आज चैत्र शुध्द प्रतिपदा,गुढीपाडवा(रविवार,दि.१८ मार्च,२०१८) हा दिवस "समाज संस्कृती दिन" म्हणून साजरा करणार आहेत.
नववर्षाची सुरूवात "नामस्मरणा" ने व्हावी या हेतूने खालील नियोजन करण्यात आले आहे. जिथे जिथे वाणी समाज बांधवांचे वास्तव्य आहे त्या सर्व ठिकाणी "समाज संस्कृती दिन" सायंकाळी ४.०० ते ४.४५ या वेळेत साजरा केला जाणार आहे.सदर कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे :-
४.००वा. एकत्रीकरण व रांगेत बसणे
४.०५वा. श्री गणपती स्तोत्र
४.१०वा. श्री गणेश अथर्वशीर्ष
४.१५वा. श्री कुलस्वामिनी स्तोत्र
४.२०वा. श्री रामरक्षा स्तोत्र
४.३०वा. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र
४.४५वा. एखादे भक्तीगीत / नामस्मरण
जास्तीत जास्त समाज बांधवांनी यांत सहभागी होऊन नामस्मरणाद्वारे समाज प्रगतीस प्रोत्साहन द्यावे.
"गुढी पाडवा" हा सण गेली अनेक वर्षे लाड सका (शाखीय) वाणी समाज "संस्कृती दिन" म्हणून साजरा करीत आलेला आहे.या वर्षी देखील "लाड सका (शाखीय) वाणी संस्कृती दिन" सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
या निमित्ताने लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या इतिहासातील या सोनेरी दिवसाचे आगळे-वेगळे महत्व ज्ञात करून घेणे नक्कीच उचित ठरेल.
महाराष्ट्रातील "गुढी पाडवा", ईशान्य भारतातील "बिहू", दक्षिण भारतातील "मकर संक्रांत", तामिळनाडूतील "पोंगल", पंजाबमधील "लोहडी", बिहार-युपीतील सकरात-मकरात", गुजरातमधील "उत्तरायण", कर्नाटकातील "सुग्गी", हिमाचलमधील "माघ साजी", कुमाउमधील "घुघुटी", ओरिसातील "मकर चौला", पूर्वांचलातील "खिचेरी", बंगालमधील "पौष संक्रांती", काश्मिरमधील "शिशुर संक्रांत", नेपाळमधील "माघे संक्रांत", सिंधमधील "तिरमूरी", थायलंडमधील "सौंक्रण", लाओस मधील "पी मस लाओ", म्यानमारमधील "थिंगयान", कंबोडियातील "मोहन सौंक्रण" या सर्वांमधील समान खगोलशास्त्रीय धागा म्हणजे
"Vernal Equinox" !
"Vernal Equinox" या खगोलशास्त्रीय घटनेत सूर्य बरोबर पृथ्वीच्या डोक्यावर "लंबात" उभा असणे व दिवस व रात्र समकालावधीचे असणे.
ही खगोलशास्रीय घटना वर्षातून फक्त दोन वेळा घडते. मार्च २०/२१ व सप्टेंबर २२/२३ या दरम्यान ! या दिवसांना "सम दिवस - सम रात्र काळ(Vernal Equinox)" असे म्हणतात.
मराठी पंचांगांनुसार मार्च महिन्यातल्या या "सम दिवस - सम रात्र" काळाला(Vernal Equinox) "चैत्र शुध्द प्रतिपदा(गुढी पाडवा)" असे म्हणतात.भारतात हा दिवस "हिंदू नववर्ष दिन(गुढी पाडवा)" म्हणून साजरा केला जातो.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या इतिहासातसुध्दा या दिवसाला आगळे-वेगळे महत्व आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेले पूर्वज काश्मिर पासून महाराष्ट्रापर्यंत पसरले व हिंदू संस्कृतीशी एकरूप(Indo-Scythian) होऊन गेले.
"भारतीय शक(Indo-Scythians)" म्हणून ओळखल्या जाणार्या या लोकांच्या उत्तर भारतातील(Northen Kshatrap) सत्तेचे केंद्र "मथुरा" येथे तर पश्चिम भारतातील (Western Kshatrap) सत्ताकेंद्र "उज्जैन" येथे होते.
त्यांचा राजा "चश्टान(Chashtana)" इ.स.७८ सालच्या "Vernal Equinox" च्या मुहूर्तावर "उज्जैन" येथे गादीवर बसला. त्याच्या राज्यारोहणाच्या या दिवसापासून "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांनी भारतात "शक संवत्सर/महासकारात(Shaka Era)" ही कालगणना सुरू केली.
(संदर्भ -
१. Chastana was the founder of the main Western Kshatrapa dynasty, the Kardamaka dynasty, and was in all probability the founder of the Saka era of the year 78 CE - Ref. www.jatland.com › home › Chastana)
२.शैलेंद्र भंडारे,२००६,
"Numismatics & History:The Maurya-Gupta interlude in the Gangetic Plains".In Patrick Olivelle.Between the Empires:Society in India 300 BCE to 400 BCE:Oxford University Press.p.69.ISBN 9780199775071)
काळाच्या ओघात "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांची पश्चिम क्षत्रप/Western Kshatrap(माळवा/मध्य प्रदेश राजस्थान, गुजरात व कोकण) या प्रांतावरील सत्ता "सका/शक/Scythian" वंशाचा राजा "नहपान" याच्याकडून "गौतमीपुत्र शतकर्णी(शालिवाहन)" नावाच्या आंध्र प्रदेशच्या राजाने हिरावून घेतली.
मात्र त्याने "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांची कालगणनेची पध्दत तशीच पुढे चालू ठेवली. ती आजतागायत "शके" या नावाने भारतात चालू आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या "चश्टान" राजाच्या नाण्याची प्रतिमा सोबत जोडली आहे.
ज्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवाच्या पूजेत हे नाणे असेल त्याने त्याची प्रतिमा या अभ्यासगटात अवश्य पाठवावी.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments