गोत्र
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाची "गोत्रे"
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलनामां" चे "अनुवंशशास्त्रा" प्रमाणे जे वर्गीकरण केले जाते त्याला "गोत्र" असे म्हणतात.
या वर्गीकरणाची यादी सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे.
ज्यांचे गोत्र एक त्यांचा पूर्वज देखील एक !
त्यामुळे लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा "प्राचीन इतिहास" जाणून घ्यायचा असेल तर लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "गोत्रे" अभ्यासणे आवश्यक आहे.
इंटरनेटवर सर्व गोत्रांच्या पूर्वजांचा, थोडक्यात ऋषींचा, इतिहास उपलब्ध आहे. लाड सका(शाखीय) वाणी समाजातील विचारवंतानी त्यांचा अभ्यास केल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या प्राचीन इतिहासावर नक्कीच प्रकाश पडेल.
सध्याची "लाड सका वाणी" लोकांची प्रचलित महाराष्ट्रीयन आडनावे व त्यानुसार गोत्रे खालील प्रमाणे आहेत.
1. भारद्वाज,भृगु,अगस्ती या प्रवराच्या "कश्यप" गोत्री लाड सका (लाड शाखीय) वाणी लोकांची प्रचलित महाराष्ट्रीयन आडनावे:- बागड,बागडे,चांदवडे,चीमठानकर,चिंचोरे,चितोडकर,दहीवेलकर,दशपुते,दशपुत्रे,दसपुते,देव, धांडे,धाटकर,धायटे,दोधे,घरटे,गोल्हार,गोलाहार,गोल्हारे,गोरे,कासोदेकर,केले,केल्हे,केला,खैरनार,खेणे,केन्हे,कोल्हार,कोठावदे,कुडे,मकर,मेतकर,नाकवा,नाकवे,नेवाडकर,पेंढारकर,फ़ुलदेवरे,शिंडकर,शिरवाडकर,सोनगीरकर,तिघई,टिपरे,तिसे,तिसा,वेढणे,वानरे
2. शौनक,सुख,विश्वामित्र,नामदेव,ध्रुव प्रवराच्या "खालप" गोत्री लाड सका (लाड शाखीय) वाणी लोकांची प्रचलित महाराष्ट्रीयन आडनावे:- बाविसकर,भारदांडे,भोकरे,ब्राह्मणकार,ब्राह्मणकर,जायखेडकर,ब्रह्मे,चांदसरकर,धामणे,एखणकर,हुडे,कोतकर,कुंभारे,लोखंडे,मनिंद,मैंद,माकडे,मार्कंडेय,मोराणकर,मुसळे,नावरकर,नेर,नेरकर,पारा,पितृभक्त,साकरीकर,सामनेरकर,सरोवरे,शिरोडे,शिरोडकर,शिरोळे,शिरोरे, शिरुडे,सोनकर,सोनकुल,सोनकुळे,वझरे,विखरनकर,वाढे,वाकलकर
3. कपिल, दुर्वास प्रवराच्या "मांडव" गोत्री लाड सका (लाड शाखीय) वाणी लोकांची प्रचलित महाराष्ट्रीयन आडनावे:- दालवेलकर,दसेगावकर,धोमणे,कोरडे,खानकरी,मराठे,नानकर,पाचपुत्रे,पाताडे,पाटे,पुरकर,सोनजे,सोंजे,येवला,येवले,येवलेकर
4. गर्ग,गौमुनी,गवाक्ष प्रवराच्या "गहिलम" गोत्री लाड सका (लाड शाखीय) वाणी लोकांची प्रचलित महाराष्ट्रीयन आडनावे:- अलई,बाबरुडकर,बधान,बधाने,बहाळकर,भामरे,भुरे,चिंचोले,डेरे,धसे,दुसाने,दुसे,गहिवडे,गहीवाड,गहीडे,खुटाडे,महाजन,मालपुरे,महालपुरे,मेखा,मेखे,ओतूरकर,पाटकर,राहुडे,सारंगे,सायनकर,शेंडे,शेंड्ये,शेवाळकर,शिनकर,सिनकर,सोनगिरे,तलवारे,तरवटे,तरोंटे,तारटकर, तर्तराख,ततार,वरखेडे
5. गोकर्ण,गौऋषी,इनालब प्रवराच्या "गौतम" गोत्री लाड सका (लाड शाखीय) वाणी लोकांची प्रचलित महाराष्ट्रीयन आडनावे:- अमृतकार,अमृतकर,अमृते,नागमोती,मेणे,खोडके,लाड,पाखले,पिंगळे,राणे,बोरसे,शेटे, देशमुख.




Comments