"चैत्र गौराई पूजन"
- dileepbw
- Sep 21, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज, नामपूर येथील महिला मंडळानेदिनांक २३/४/२०१७ रोजी सायंकाळी ४-३० वाजता योगायोग चौक,ता.नामपूर,जि. नाशिक येथे आयोजित केलेला "चैत्र गौराई पूजन" या धार्मिक कार्यक्रमात कित्येक सखींना लहानपणीची लाकडाची गौर,टरबूज व खरबूजांच्या बियांच्या माळा,नदीवरून भरून आणलेली तांब्याची कळशी,परकर पोलके घालून खेळलेले खेळ यांची आठवण झाली.
बालपणीच्या अशा आठवणींना ऊजाळा मिळावा तसेच गौराईच्या गाण्यांची आठवण व्हावी म्हणूनच हा उपक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महिलांचे एकत्रीकरण झाले.हे ही नसे थोडके !
सौ.स्नेहलता नेरकर,अध्यक्षा,महिला मंडळ,नामपूर यांच्या पुढाकाराने आयोजित झालेल्या या कार्यक्रमात गौराईची गीते,चुटकुले,नृत्य,विविध खेळ,उखाणे घेण्याची स्पर्धा,संगीत खुर्ची अशा करमणूकीच्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमानंतर "अल्पोपहार" ची सोय देखील करण्यात आली होती.
सुमारे दोन तास चाललेल्या या समाज संघटनाच्या कार्यक्रमात सर्व भगिनींनी "हिरव्या साड्या" परिधान करून सामाजिक एकजूट दाखविली.
अशा कार्यक्रमांमधून लाड सका (शाखीय) वाणी समाजाला "थॅलेसेमियामुक्त" करण्यासाठी अवश्य जनजागृती केली जावी.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९४९४, गट २ - ४६५९, गट ३ - ४९३९, गट ४ - ३४८६, गट ५ - १४३०)




Comments