जातीभेद
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
इ.स.१८८१ मध्ये “श्री.विष्णूशास्त्री चिपळूणकर” यांनी ब्राह्मणेतर चळवळीतील “लोकहितवादी”, “महात्मा फुले” व “बाबा पदमजी” या ब्राह्मणद्वेष्ट्यांवर टीका केली (संदर्भ:- निबंधमाला व "ज्याचा त्याचा ब्राह्मणांवर कटाक्ष" हा दै. केसरी, मार्च,१८८१ मध्ये प्रकाशित झालेला लेख).
पण त्याचबरोबर “श्री.विष्णूशास्त्री चिपळूणकर” राष्ट्रवादी भूमिकेतून, जातीभेदांवर सुद्धा टीका करीत असत.
भारत जन्मभूमीचा अभिमान शिथिल होण्यास "राष्ट्राचे विस्तीर्णत्व" व "जातीभेद" ही दोन मोठी कारणे आहेत व जातीभेदाने भारतामध्ये प्रचंड फुट पडली असून त्याचा गैरफायदा इंग्रज सरकार घेत आहे असे त्यांचे मत होते(संदर्भ:- देशोन्नती, दै.केसरी,दि.१४ मार्च,१८८२).
हा राष्ट्रीय विचार पटायला व त्यानुसार आचरण करायला "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजा" ला २० वे शतक उजाडावे लागले.
तेव्हासुद्धा, अन्य जातीच्या लोकांबरोबर सहभोजन केल्याबद्दल, लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातून बहिष्कृत केलेल्या,राष्ट्रीय विचाराच्या तरुणांना,पुन्हा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात सामवून घेण्यासाठी "बागलाणचे बाबा-श्री. नरहर गोपाल अलई ” यांना लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाशी झगडावे लागले.




Comments