top of page

"टारगिटॉस(Targitaus)", म्हणजेच "सका/शक/Scythian" वंशाच्या पहिल्या पुरूषाची दंतकथा

  • dileepbw
  • Jun 22, 2020
  • 1 min read

Updated: Sep 5, 2022

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.


मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)


इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.


लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या या स्थलांतराच्या मार्गावरील कझाकस्तान येथे प्रचलित असलेली तेथे प्रवेश करणारा पहिला "सका/शक/Scythian" पुरूष "टारगिटॉस(Targitaus)" बद्दलची दंतकथा वाचण्यासारखी आहे.


इ.स.पूर्व दुसर्‍या शतकात मध्य आशियातील "आंद्रोनोव्हो (Andronovo)" संस्कृतीमधील शेतकरी सध्याच्या कझाकस्तानात स्थलांतरीत झाले.इराणी लोक त्यांना "साकी(Sacae)" म्हणून तर ग्रीक लोक त्यांना "सायथियन (Scythians)" म्हणून ओळखत असत. कझाकस्तानातील दंतकथांनुसार टारगिटॉस(Targitaus) हा कझाकस्तानातील पहिला साकी(Sacae)/सायथियन (Scythians) पुरूष समजला जातो.त्याने Borysthenes (सध्याची Dnieper) नदीच्या कन्येशी विवाह केला व तिच्यापासून त्याला लेपॉक्सिस(Leipoxais),अरपॉक्सिस(Arpoxais) व कोलॅक्सिस (Colaxais) नावाचे तीन पुत्र प्राप्त झाले.त्यांना आकाशातील देवाकडून नांगर,जू,कुर्‍हाड व चषक (plough,yoke, battle-axe,drinking-cup) या सोन्याच्या चार दैवी देणग्या प्राप्त झाल्या.लेपॉक्सिस(Leipoxais) व अरपॉक्सिस(Arpoxais) यांनी स्पर्श करताच त्या तप्त होत.पण कोलॅक्सिस (Colaxais) ने स्पर्श केल्यास त्या तप्त होत नसत.त्यामुळे कझाकस्तानातचा राजा म्हणून कोलॅक्सिस(Colaxais) याची निवड करण्यात आली.अशी ही दंतकथा सांगते.


लेपॉक्सिस(Leipoxais) व अरपॉक्सिस(Arpoxais) यांच्यापासून अनुक्रमे औकाती(Auchatae),कॅटिअरी व ट्रासपियन्स या "सका" टोळ्या निर्माण झाल्या.तर कोलॅक्सिस (Colaxais) पासून पॅरालेटी(Paralatae) हा "सका" राजवंश निर्माण झाला.


ree

Recent Posts

See All
कुलग्रामे व कुलनामे

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page