तुर्कस्तानात स्थलांतर
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
मध्य आशियातील "सायबेरिया" प्रांतामधील "टूंड्रा" या गवताळ प्रदेशातून लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका" वंशाचे काही पूर्वज(शक/सका) भारतात तर काही पूर्वज(Scythians/Askanazi) तुर्कस्तानात स्थलांतरित झाले.
तुर्कस्तानची राजधानी "अंकारा" येथील "सका" वंशाच्या लोकांची "अनातोलियन" संस्कृती तेथील संग्रहालयाचे संचालक "डाॅ.हलील डेमेरडेलेन" यांनी मला समजावून सांगीतली तर भारतात स्थलांतरित झालेल्या "सका/शक" लोकांचा इतिहास त्यांनी माझ्याकडून जाणून घेतला व त्याबाबत समाधान व्यक्त केले.
या पार्श्वभूमीवर समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाजबांधवांनी आपआपल्या कुलाचा इतिहास शोधून काढल्यास त्यांना आपल्या "सका" वंशाचे मूळ मध्य आशियात असल्याचे सहज लक्षात येईल.
व्यापारासाठी मध्य आशियातील "अरल" समुद्रापासून ते पार "भूमध्य (मेडिटेरेनियन)" समुद्रापर्यंत जाऊन पोहोचलेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" वंशाच्या पूर्वजांचा व्यापार सुमारे तेवीस भूमध्यसागरी देशांमध्ये जाऊन पोहोचला होता.त्यासाठी त्यांनी केलेल्या होड्यांच्या वापराला इसवी सन पूर्व एक लाख,तीस हजार वर्षांचा इतिहास आहे."फिनिशियन" म्हणून ओळखले जाणारे हे व्यापारी इसवी सन पूर्व १२०० सालापासून स्वर व व्यंजनांचा संयुक्त वापर करणारी (Abugida/Alphasyllabary) "ब्राम्ही" ही भारतीय क्युनिफाॅर्म पध्दतिची लिपी व्यवहारासाठी वापरत असत.
तुर्कस्तानची अनेकेश्वरवादी ग्रीको-रोमन संस्कृती त्यांनी आपल्या "फिनिशयन" संस्कृतीने बदलून टाकली.काळाच्या ओघात "सका" वंशाच्या व्यापार्यांची ही "फिनिशयन" संस्कृती त्या नंतरच्या जेत्यांनी अनुक्रमे अचेमेनियन (पारशी), हेलेनिस्टिक(ग्रीक),बायझांटियन(रोमन), सासानियन,इस्लामिक/खलिफात (अरब) संस्कृतीत बदलून टाकली.
इसवी सनाच्या बाराव्या शतकात युरोपमध्ये "औद्योगिक क्रांती (Renaissance)" अवतरली व आंतरराष्ट्रिय व्यापारात आमूलाग्र बदल घडू लागले. नवे समुद्रमार्ग सापडल्यामुळे खुष्कीच्या मार्गावरील तुर्कस्तानचे व्यापारी महत्व कमी होऊ लागले व नीलमणी,धान्य,मसाल्याचे पदार्थ,रेशीम इत्यादी वस्तूंच्या व्यापाराची व "सका" वंशाच्या व्यापार्यांची आर्थिक पीछेहाट होऊ लागली.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी,M.D .(Pathology) (देव,भडगावकर)
व्यवस्थापक, फेसबुकवरील "'History of Lad Saka (Ladshakhiy) Wani Samaj" हा अभ्यासगट
(सभासद संख्या - ५६८०)




Comments