थॅलेसेमिया प्रतिबंध
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
"लाड सका(शाखीय) वाणी समाजातील समस्त कुलस्वामिनी भक्तांना विनम्र आवाहन"
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलस्वामिनी मंडळे पदयात्रेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.या पदयात्रांमध्ये सहभाग घेणार्या सर्व भक्तांचे मन:पूर्वक अभिनंदन !
धार्मिक कार्यासाठी एकत्र येणार्या या समाज बांधवांना पिढ्यान् पिढ्या उपयुक्त ठरेल अशा वैज्ञानिक,सामाजिक व वैद्यकीय कार्याकडे वळविता येईल का ?
सहज शक्य आहे हे !
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सुमारे ५% समाज बांधव "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराचे वाहक आहेत. ते नेमके कोण ? हे आज त्यांना देखील माहित नाही. "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी केल्याशिवाय ते कळणार देखील नाही.
काय वैद्यकीय महत्व आहे या तपासणीचे ?
ही तपासणी केल्यास कोणी कोणाशी विवाह करायचा नाही हे आपल्याला कळणार आहे. असे विवाह टाळल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाज हा "थॅलेसेमियामुक्त समाज" होणार हे निश्चित !
त्यामुळे समस्त कुलस्वामिनी भक्तांना माझे विनम्र आवाहन आहे की त्यांनी "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराबद्दल जाणून घ्यावे व पुढील वर्षीच्या चैत्री पौर्णिमेला(१५ एप्रिल,२०१७) बेटावद,धुळे येथे सालाबाद प्रमाणे आयोजित केल्या जाणार्या "कुलस्वामिनी महोत्सव" या वार्षिक कार्यक्रमात समस्त "लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांच्या रक्त तपासणीची सोय उपलब्ध करुन द्यावी.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६९०५)




Comments