top of page

थॅलेसेमिया प्रतिबंध

  • dileepbw
  • Oct 6, 2022
  • 1 min read

"लाड सका(शाखीय) वाणी समाजातील वधू-वर,मध्यस्थ,तसेच वधू-वर सूचक मंडळांचे संचालक यांनी अभ्यास करावा असा "थॅलेसेमिया" नावाचा विवाहातून प्रसारण होणारा अनुवांशिक व जन्मजात रक्तविकार"

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका" वंशाचे पूर्वज सायबेरियाच्या बर्फाळ प्रदेशातून भूमध्य सागरा (Mediterranean Sea)शेजारील पाणथळीच्या प्रदेशात आल्यानंतर "सका" लोकांना तेथील "मलेरिया" च्या जंतूंशी सामना करावा लागला.

हा सामना यशस्वी होण्यासाठी निसर्गाने त्यांच्या रक्तात काही बदल(Mutation) केले.हे बदल अनुवांशिकपणे पुढच्या अनेक पिढ्यात उतरले.याचा शोध अमेरिकेच्या रॉचेस्टर विद्यापीठातील, नोबेल पारितोषिक विजेते शरीरविकृतीशास्त्रज्ञ(पॅथाॅलाॅजिस्ट) डाॅ.जाॅर्ज व्हिपल व त्यांचे बालरोगतज्ञ सहकारी प्रा.डाॅ.विल्यम ब्रॅडफोर्ड यांनी इ.स.१९३२ साली लावला.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका" वंशाचे पूर्वज महाभारतात "दक्षिणपथ (द्वारका-बाल्हिक)" व "उत्तरपथ (बाल्हिक-तुर्कस्तान)" या नावाने ओळखल्या जाणार्‍या व्यापारी मार्गांवरून(गुजरात-कच्छ-राजस्थान-पंजाब-काश्मिर-सिंध-पाकिस्तान-अफगाणिस्तान (बाल्हिक,बाख्त,बॅक्ट्रिया)-तुर्कमेनिस्तान, किरगिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान - तुर्कस्तान) "मसाल्याच्या पदार्थां" चा व्यापार करीत असत.त्यामुळे साहजिकच असे रक्तात बदल झालेले "सका" लोक या मार्गावर आढळून येतात.

रक्तातील "हिमोग्लोबिन" या घटकात झालेले हे बदल "थॅलेसामिया स्क्रिनिंग" या रक्त तपासणीत उघडकीस येतात.

"सका" लोकांच्या स्थलांतराच्या मार्गावरील "पंजाब" या प्रांतात "पंजाबी हिमोग्लोबिन (Haemoglobin D Punjab)" नावाचा उपप्रकार आढळून येतो.

महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांच्या रक्तात कोणते बदल झाले आहेत हे अशा तपासण्या झाल्यावर समजून येईल.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी,M.D .(Pathology) (देव,भडगावकर)

व्यवस्थापक, फेसबुकवरील "'History of Lad Saka (Ladshakhiy) Wani Samaj" हा अभ्यासगट

(सभासद संख्या - ५७२०)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page