"देव" कुलाचा इतिहास
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांच्या कुलग्रामांजवळ प्राचीन काळी गौतम ऋषी "गौताला" या चाळीसगाव जवळील ग्रामामध्ये वास्तव्याला होते असा उल्लेख "रामचरितमानस" या ग्रंथामध्ये आढळतो. त्या ठिकाणी आता "गौताला औत्रम घाट अभयारण्य" वसलेले आहे.
त्याचप्रमाणे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामधील पितळखोरा जैन लेणी(दिगंबर जैन स्वामी भवसागर महाराज यांचे स्थान),पाटणादेवीचे हेमाडपंथी महादेव मंदिर,सीता खोऱ्यामधील धबधबा,सीतेचे स्नानगृह,हत्ती महाल,धवलतीर्थ धबधबा,केदारकुंड धबधबा,भास्कराचार्य संग्रहालय,मद्रासी बाबाचा मठ,तर्वाड्याचे साई बाबा मंदिर,तितूर नदीकाठचे मुदाई देवी मंदिर,शेंदुर्णीचे सिंदुरासूर मंदिर,पारोळ्याचा राणी लक्ष्मीबाईचा किल्ला,धडगावचा अक्राणी महाल,वाघळीचे हेमाडपंथी मुदलादेवी मंदिर,एरंडोलचे पद्मालय,फरकांड्याचे झुलते मनोरे,चोपड्या जवळील उनपदेवचे गरम पाण्याचे झरे,प्रताप कॉलेज अमळनेरमध्ये संग्रहित केलेले साने गुरुजींचे साहित्य,जागतिक कीर्तीचा छायाचित्रकार केकी मुसचे कला दालन,असोद्याचे कवयित्री बहिणाबाई चौधरींचे घर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे "सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांच्या जळगाव या जिल्ह्यामध्ये आहेत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments