"देव" कुलाची उत्पत्ती
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचा वृत्तांत - "देव" कुलाची उत्पत्ती
कोणत्याही कुलाची उत्पत्ती एका पुर्वजापासून झाली असे मानले जाते.
सर्व साधारणपणे भारतातील जातींची उत्पत्ती कशी झाली,जातीचा व्यवसाय कसा निश्चित झाला या संबंधीच्या कथा "जातीपुराण" या ग्रंथ/बाड किंवा रंगीत चित्र पट्टिका या स्वरुपात उपलब्ध असतात.
(उदा.मातंगांचे बसवपुराण,महारांचे महारमहात्म्य,कासारांचे कालीकापुराण,न्हाव्यांचे नाभिकपुराण इ.) (कृपया पुस्तक पहा)
पण भारतातील अन्य जातींप्रमाणे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "जातीपुराण" मात्र प्रयत्न करूनही उपलब्ध होऊ शकलेले नाही.
मात्र लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या उत्पत्ती बाबत तसेच गोत्रांबाबत काही कथा "मौखिक" परंपरेने लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या लग्नादी प्रसंगात हमखास आढळणारे व "पारशी" या सांकेतिक भाषेत कुलवृत्तांत सांगणाऱ्या "भाटां(राखी)" कडून चालत आल्या आहेत.(कृपया चित्र पहा)
तसेच निरनिराळ्या क्षेत्रांच्या ठिकाणी "कुलोपाध्याय" आपल्या चोपड्यांमध्ये "कुलपरंपरा" लिहून ठेवतात. त्यावरून कुणालाही आपण ज्या वंशात आहोत त्या वंशाचे पूर्वज कोण होते ही माहिती लिखित पुराव्याच्या आधारे कळू शकते. लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाचे असे "भाट(राखी)" व "कुलोपाध्याय" अजूनही आहेत. ते लग्नादी प्रसंगी येउन संबंधित कुलाचा कुलवृत्तांत सांगतात.त्यांची स्तुतीस्तोत्रे गातात.भाटांची ही कवने किंवा विशिष्ट शैलीत "चुर्णीके" च्या स्वरुपात कथन केलेले कुलवृत्तांत यांवरून लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या निरनिराळ्या कुलांविषयी व त्यांच्या गोत्रांविषयी माहिती समजते.
अलीकडच्या काळात असे "भाट(राखी)" क्वचित येतात. त्यामुळे कुलवृत्तांत कळणे कठीण होते.लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या उत्पत्ती संबंधी त्याच प्रमाणे स्थलांतरासंबंधी "साधार" अशी माहिती उपलब्ध होत नाही.परंपरेने जी काही माहिती उपलब्ध झाली आहे ती मौखिक परंपरेने चालत आली आहे.
(संदर्भ:-“बागलाणचे बाबा",पृष्ठ क्र.३४-३६,लेखक -प्रा.डॉ.प्रभाकर मांडे, प्रकाशक-गोदावरी प्रकाशन).
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments