"देव कुलाचे कुलचिन्ह(देवक)"
- dileepbw
- Dec 11, 2022
- 2 min read
"हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास"
"वडाचे झाड" हे हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचे कुलचिन्ह(देवक)" समजले जाते.
अवाढव्य विस्तार असल्यामुळे व्यापार उदीम करण्यासाठी ऐस पैस सावली देणारे व पारंम्ब्यांमुळे वेगवेगळी दुकाने एकाच ठिकाणी थाटण्यासाठी नैसर्गिक खोल्या देणारे "वडाचे झाड" हे "देव" कुलाचा पारंपारिक व्यवसाय असलेल्या "किराणा मालाची किरकोळ विक्री" या व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त असे. अशा झाडाभोवती बांधलेला "पार" हे या समाजाचे खास वैशिष्ट्य असे.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचे, प्राचीन काळी मध्य आशियात वास्तव्याला असणारे,शिकारी व आदिवासी जनजीवन जगणारे, "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज, सामाजिक स्थिरतेसाठी "कुलचिन्ह(देवक)" ही एक संकल्पना पाळत असत. धर्म संकल्पना अस्तित्वात नसल्यामुळे तेव्हा फक्त "निसर्गपूजन" चालत असे. "कुलचिन्ह(देवक)" या संकल्पनेला तेव्हा "देवा" इतकेच महत्व असे.
"कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीपासून पासून आपली उत्पत्ती झाली आहे असे हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज तेव्हा मानत असत. "कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीचे आपल्याला सदैव संरक्षण असते अशी त्यांची धारणा असे.
"कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीपासून आपली उत्पत्ती झाली आहे असे मानून व त्यामुळे आपला चरितार्थ चालतो याची जाणीव ठेवून अशा गोष्टीची "पूजा" केली जाते. "कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीची हानी होईल असे कोणतेही कृत्य केले जात नाही .
"कुलचिन्ह(देवक)" या गोष्टीला "देव" कुलाचा रक्षणकर्ता मानून मंगल प्रसंगी त्याची आदर पूर्वक पूजा केली जाते. त्यामुळे "वड पूजन" हा हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा एक अत्यंत महत्वाचा संस्कार समजला जातो.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात एकच "कुलचिन्ह(देवक)" असणाऱ्या स्त्री-पुरुषात विवाह संबंध होऊ शकत नाहीत.
"वडाचे झाड" हे देव कुलाच्या पारंपारिक व्यवसायाचे म्हणजे व्यापाराचे साधन (डिपार्टमेंटल स्टोअर) असल्याने तेच त्यांचे "कुलचिन्ह(देवक) आहे.
(संदर्भ :-लाड शाखीय वाणी समाजाचे सण - वडपूजन,चैतन्यदीप).
"कुलचिन्ह(देवक)" प्रथेला त्याकाळी जरी धर्मसंस्थेचे स्वरूप प्राप्त झालेले नव्हते तरी धर्मसंस्थेचे काही घटक या प्रथेत आढळून येतात.विशेषतः यातूविद्येशी "कुलचिन्ह(देवक)" प्रथेचा निकटचा संबंध असला पाहिजे.पूर्वजपूजा(देव कुलामध्ये प्रचलित असलेली वडाच्या झाडाखाली मांडलेल्या पूर्वजांच्या मूर्ती उर्फ "वडदखन्या"),मृतात्म्यावरील विश्वास,एखाद्या दिव्य शक्तीचे अस्तित्व मानणे या सर्व गोष्टींचे"कुलचिन्ह(देवक)प्रथे" शी धागेदोरे जुळतात.
धुळ्याची "एकविरा माता" हे हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचे" सामूहिक कुलचिन्ह(देवक)" मानले जाते. "एकविरा माताजी" यांना संपूर्ण "देव" कुलाचाच आधार मानण्याची प्रथा आहे. "सामूहिक कुलचिन्ह(देवक)" आणि "व्यक्तिगत कुलचिन्ह(देवक)" परस्परांहून भिन्न मानण्याचीही प्रथा "देव" कुलामध्ये आढळून येते.
"व्यक्तिगत कुलचिन्ह(देवक)" वंश परंपरेने "देव" कुलातील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. "देव" कुलातील समाज बांधव एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राणी अथवा वनस्पती यांचा संबंध व्यक्तिगत पातळीवरही आणू शकतात. अशा प्रकारचे "कुलचिन्ह" त्या समाज बांधवाला काही "अलौकिक/दैवी" अशी शक्ती प्राप्त करून देते असा समज आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments