"देव" कुलाची भाषा
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan)
"देव" हा शब्द शक, पारसी, आर्य इ. प्रोटो-इंडो-इराणियन(Proto-Indo-European- P.I.E.) जन समूहांच्या मूळ "टोचेरीयन(Tocheriyan)" भाषेमधील "दिवस(Dyeus)" या शब्दापासून आला आहे.
हिंदू "वैदिक" संस्कृतीमध्ये या टोचेरीयन शब्दाचे संस्कृतमध्ये रुपांतर झाले "दिवस (Dyaus)" !
"दिवस (Dyeus)" या शब्दाचा अर्थ आहे "चमकणारा"! या शब्दाचा मूल धातू आहे - "दिव" ! "दिव" म्हणजे "चमकणे" ! या शब्दाचे स्त्रीलिंगी रुपांतर "देवी"! तर जेथून या प्रकाशाचा उगम होतो तो "देवलोक"!
जसे जसे प्रोटो-इंडो-इराणियन लोक मध्य आशिया मधून पूर्वेकडे स्थलांतरित होऊ लागले तसे तसे त्यांचे विविध गट पडू लागले. जो गट "हिंदुकुश" पर्वत ओलांडून भारतवर्षामध्ये दाखल झाला त्यामध्ये शक,कुशाण व हूण यांचा समावेश होतो. जो गट "कॉकेशस" पर्वत ओलांडून युरोपकडे गेला ते युरोपिअन झाले. (कृपया नकाशा पहा)
मूळ "टोचेरीयन(Tocheriyan)" भाषेमधून जन्माला आलेल्या अन्य प्रोटोइंडोयुरोपिअन (Proto-Indo-European - P.I.E.) भाषांमध्ये "देव" हा शब्द कसा रुपांतरीत होत गेला आहे ते आता पहा.
प्रोटो-इंडो-युरोपिअन(Deiuó),इंडो-इराणियन(Deva),जुनी अवेस्तन भाषा(Daēuua /Daēva), जुनी इरानिअन भाषा(Daiva),वैदिक संस्कृत(Devá),इंडो-आर्यन(Dev), उर्दू(Deo),जॉर्जिअन(देवी), लिथुआनियन(दयवस), लात्वियन(दिवसपारसी(दीवास), जर्मन(तिवास), नॉर्स(तिवार), लाटिन(देवूस) !
"डिवाईन(Divine)" या इंग्लिश शब्दामध्ये तसेच अन्य भाषांमधील शब्दांमध्ये फ्रेंच (Dieu), पोर्तुगीज(Deus), स्पानिष(Deos), इटालिअन(डिओ), ग्रीक(Zeys)], पश्तू (Dew) तुम्हाला कुठे "देव" सापडतोय का पहा बरे !
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments