"देव" कुलाची माहिती
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलबांधवांची काही कुलग्रामे (पिलखोड,हरेश्वर पिंपळगाव,टाकळी इ.) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आहेत.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांच्या कुलग्रामाजवळ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामधील पितळखोरा जैन लेणी(दिगंबर जैन स्वामी भवसागर महाराज यांचे स्थान) ,पाटणादेवीचे हेमाडपंथी महादेव मंदिर,सीता खोऱ्यामधील धबधबा,सीतेचे स्नानगृह, हत्ती महाल, धवलतीर्थ धबधबा, केदारकुंड धबधबा, भास्कराचार्य संग्रहालय, मद्रासी बाबाचा मठ, तर्वाड्याचे साई बाबा मंदिर, तितूर नदीकाठचे मुदाई देवी मंदिर, शेंदुर्णीचे सिंदुरासूर मंदिर,पारोळ्याचा राणी लक्ष्मीबाईचा किल्ला,धडगावचा अक्राणी महाल, वाघळीचे हेमाडपंथी मुदलादेवी मंदिर,एरंडोलचे पद्मालय,फरकांड्याचे झुलते मनोरे,चोपड्या जवळील उनपदेवचे गरम पाण्याचे झरे, प्रताप कॉलेज अमळनेरमध्ये संग्रहित केलेले साने गुरुजींचे साहित्य, जागतिक कीर्तीचा छायाचित्रकार केकी मुसचे कला दालन, असोद्याचे कवयित्री बहिणाबाई चौधरींचे घर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
ही प्रेक्षणीय स्थळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांनी जरूर पहावी पण त्याचबरोबर आपल्या मूळ कुलग्रामालाही भेट द्यायला विसरू नये.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments