"देव" कुलाच्या प्रथा
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचे धार्मिक कार्य देखील वाखाणण्यासारखे आहे. कुलाच्या सर्व कामात "धार्मिक कार्य" हे कार्य सर्वात महत्वाचे मानले जाते.
"देव" कुलातील समस्त देवदेवतांची पूजा,सण,उत्सव,समारंभ,कुलाचार,धार्मिक परंपरा वगैरे "देव" कुल सदस्यांकडून पार पडल्या जाव्यात असे बंधन असते.
प्रत्येक कुलाचे सार्वजनिक उत्सव,धार्मिक सण,समारंभ वेगवेगळे असल्याने या संबंधीचे ज्ञान जतन करण्याची जबाबदारी "देव" कुलातील सदस्यांची असते.
अलीकडे आधुनिक कालमानाने व औद्योगिक प्रगतीमुळे बहुधा सर्वच जाती जमातींमधून कुल प्रथा नाहीशा होत चालल्या आहेत.तरीपण अद्यापही अनेक "देव" घराण्यात कुल दैवत,कुलाच्या परंपरा,प्रतिष्ठा यांना महत्व दिले जाते.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments