देव" कुलवृत्तांत
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चारितार्थासाठी "सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलबांधव संपूर्ण जगात विखुरले गेले आहेत.
त्या सर्वांची माहिती संकलित करणे मोठे जिकीरीचे आहे. एक प्रयत्न म्हणून लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाचे मुखपत्र "चैतन्यदीप" मधून सर्व "देव" कुल बांधवांकरिता एक आवाहन प्रसृत केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. धुळे व नाशिक येथील लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या विविध संघटनांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या वास्तव्यदर्शिकांमधून "देव" कुलबांधव शोधून काढले व त्यांच्या याद्या माझ्याकडे पोहोचत्या केल्या.
पण काही "देव" कुलबांधवांनी आपल्या पिढीजात व्यवसायाचे "वाणी" हे नाव, तर काही "देव" कुलबांधवांनी आपल्या "मूळ गावाचे नाव" हे "कुलनाम" म्हणून पसंत केले आहे. त्यामुळे त्यांची "देव" ही ओळख त्यांनी स्वतः होऊन करून दिल्याशिवाय कळणेच अवघड आहे. अशा सर्व "देव" कुलबांधवांची यादी या पुस्तकात परिशिस्ट स्वरुपात आली तर या "देव कुलवृतांता" ला परिपूर्णता येईल.
(उदाहरणादाखल कृपया चित्पावन ब्राह्मण लोकांच्या इतिहासाचे पुस्तक पहा)
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments