देवांचा आठवडे बाजार
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "पिलखोड" येथे मूलत: वास्तव्याला असलेले "देव व शिरोडे" समाजबांधव आपल्या "पिलखोड" गावाच्या दैनदिन गरजा भागविल्यानंतर शेजारच्या छोट्या खेड्यात भरणारे,गोर गरिबांच्या साप्ताहिक गरजा भागवणारे "आठवडेबाजार", देवस्थानांच्या ठिकाणी (नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, नौताला, भूगाव, वडनेर,इगतपुरी जवळील पिंपरी,शेंदुर्णी,नामपूर,बोगटे इ.) भरणाऱ्या,मध्यम वर्गीयांच्या मासिक, अर्धवार्षिक वा वार्षिक गरजा भागवणाऱ्या "वार्षिक जत्रा" येथे व्यापार करीत असत.
तेथे त्यांना अन्य, विशेषतः मारवाडी व्यापाऱ्यांशी, टक्कर द्यावी लागत असे.
भांडवल वाढल्यावर व्यापाराच्या वस्तूंचे स्वरूप बदलत जात असे.
किराणा मालाबरोबरच "कापडा" चा व्यापार सुरु होत असे.
त्यातून अधिक भांडवल जमले की मग "सावकारी" सुरु होत असे.
अशा "नगर शेठां" ची कोणा समाजबांधवांना माहिती असल्यास त्यांनी ती या अभ्यास गटात जरूर प्रसृत करावी.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments